I Will Vote : लोकसभा निवडणुकीत मतदान करण्याची विद्यार्थ्यांनी घेतली शपथ

सोमवार, 18 मार्च 2019

पुणे : ''लोकशाहीचे भवितव्य आम्ही आहोत. तिला फुलवायची जबाबदारी आम्हा तरुणांची आहे. तर निवडणुका हा लोकशाहीचा उत्सव असेल, तर त्यापासून आम्ही दूर राहणारच नाही. केवळ आम्ही स्वत:च नाही, तर आमचे पालक आणि मित्र यांनाही मतदान करण्यास प्रवृत्त करू'', असे निश्‍चिय एच. व्ही. देसाई महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी केला. 
 
"सकाळ'च्या I Will Vote या उपक्रमाअंतर्गत या विद्यार्थ्यांनी लोकसभा निवडणुकीत मतदान करण्याची शपथ घेतली. सकाळचे सहयोगी संपादक रमेश डोईफोडे यांनी विद्यार्थ्यांना शपथ दिली.

उपजिल्हा निवडणूक अधिकारी मोनिका सिंह, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गिरीश पठाडे, प्रशासन अधिकारी अभिजित पवार यावेळी उपस्थित होते.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Students take oath in to vote in the parliamentary elections