दहावी पास विद्यार्थ्यांनो, ITI ऍडमिशनसाठी करा ऑनलाइन अर्ज; वाचा सविस्तर

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 9 January 2021

राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांतील सर्व प्रकारच्या जागांसाठी प्रवेश हे केंद्रीय ऑनलाइन पद्धतीने होतात. केंद्रीय पद्धतीत उपलब्ध जागा आणि संस्था स्तरावरील जागांसाठी ऑनलाइन अर्ज सादर करणे आवश्‍यक राहणार आहे.

पुणे : राज्यातील सर्व शासकीय आणि खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील (आयटीआय) प्रवेशासाठी केलेल्या अर्जात दुरुस्ती आणि दहावीच्या पुरवणी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.

यासाठी प्रवेश अर्ज सादर करण्याची संधी व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाने उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे आता दहावीच्या पुरवणी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या आणि आयटीआय प्रवेशाच्या प्रतीक्षेत असलेल्या विद्यार्थ्यांना येत्या सोमवारी (ता.11) सायंकाळी पाच वाजेपर्यंत ऑनलाइन अर्ज भरता येणार आहे. 

लडाखमध्ये घुसखोरीचा प्रयत्न; भारतीय सैन्याने चीनी सैनिकाला पकडले!​

राज्यातील शासकीय आणि खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील शिल्प कारागीर प्रशिक्षण योजनेतंर्गत ऑगस्ट 2020 सत्रातील प्रवेश हे केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया पद्धतीने करण्यात येत असून प्रवेशाची सविस्तर माहिती http://admission.dvet.gov.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांतील सर्व प्रकारच्या जागांसाठी प्रवेश हे केंद्रीय ऑनलाइन पद्धतीने होतात. केंद्रीय पद्धतीत उपलब्ध जागा आणि संस्था स्तरावरील जागांसाठी ऑनलाइन अर्ज सादर करणे आवश्‍यक राहणार आहे. कोणत्याही परिस्थितीत ऑनलाइन प्रवेश प्रणाली व्यतिरिक्त प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रवेश ग्राह्य धरण्यात येणार नाही, याची नोंद विद्यार्थी, पालक आणि आयटीआय संस्थांनी घ्यावी, अशी सूचना व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाने केली आहे. 

Breaking:भारतात कोरोना लसीकरणाला होणार सुरुवात; तारीखही निश्चित

प्रवेश प्रक्रियेचा तपशील : कालावधी 
- ऑनलाइन अर्ज भरणे, अर्जात दुरुस्ती करणे, प्रवेश अर्ज पूर्ण भरल्यानंतर प्रवेश अर्ज शुल्क जमा करणे : 11 जानेवारीपर्यंत (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) 
- गुणवत्ता यादी प्रसिद्ध करणे : 12 जानेवारी (सायंकाळी पाच वाजता) 
- खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील संस्था स्तरावरील प्रवेश निश्‍चित करणे : 16 जानेवारीपर्यंत  

- पुण्यातील इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Students who passed SSC supplementary exam will be able to apply online for ITI