‘कोरोना’काळातील अध्यापन पद्धतीचा अभ्यास

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 29 September 2020

कोरोनाचा संसर्ग वाढत असताना शिक्षक शक्‍य होईल त्या पद्धतीने विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण पोचवत आहेत. त्यासाठी ते कधी शाळेतून किंवा घरातून थेट ऑनलाइन येत आहेत. तर कधी आकर्षक व्हिडीओ तयार करून, व्हाट्‌सॲपवर अभ्यास पाठवून विद्यार्थ्यांना शिकवीत आहेत.

पुणे - कोरोनाचा संसर्ग वाढत असताना शिक्षक शक्‍य होईल त्या पद्धतीने विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण पोचवत आहेत. त्यासाठी ते कधी शाळेतून किंवा घरातून थेट ऑनलाइन येत आहेत. तर कधी आकर्षक व्हिडीओ तयार करून, व्हाट्‌सॲपवर अभ्यास पाठवून विद्यार्थ्यांना शिकवीत आहेत. 

इंटरनेट, मोबाईल पोचू शकत नसेल, तर शिक्षक स्वतः पायपीट करत विद्यार्थ्यांना घरोघरी जाऊन शिकवत आहे. अशाप्रकारे संकट काळात शिक्षक प्रत्यक्ष राबवित असलेल्या शिक्षण पद्धतीचे आता संकलन होणार आहे. त्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने (एससीईआरटी) पुढाकार घेतला आहे.

पुण्यात महामेट्रोला मोठा ब्रेक थ्रू; 1600 मीटरचा बोगदा पूर्ण

राज्यातील सर्व व्यवस्थापनांच्या, सर्व माध्यमांच्या प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक राबवित असलेल्या उपक्रमांची माहिती केंद्र आणि राज्य सरकारला देण्यात येणार आहे. तसेच शिक्षकनिहाय ऑनलाइन आणि ऑफलाइन अध्ययन-अध्यापन पद्धतीच्या माहितीचे दर आठवड्याला संकलन केले जाणार आहे, अशी माहिती परिषदेचे संचालक दिनकर पाटील यांनी दिली आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

शिक्षक प्रामाणिकपणे काम करत आहेत. असे असताना त्यांच्या कामाचा अहवाल मागणे चुकीचे आहे. हे म्हणजे शिक्षकांवर अविश्वास दाखविल्यासारखे झाले. विद्यार्थ्यांना शिकविण्याच्या कामात व्यग्र असताना अहवाल पाठविण्याच्या कामाची त्यात भर पडल्याने काम वाढले आहे.
- माधव सूर्यवंशी, शिक्षक

पश्चिम हवेलीतील 17 गावांमध्ये सुरु होणार 'ग्राम सुरक्षा यंत्रणा'

असे होणार संकलन

  • http://covid19.scertmaha.ac.in या पोर्टलवर शिक्षकनिहाय माहितीचे संकलन केले जाणार.
  • शिक्षकांनी पोर्टलवर जाऊन नोंदणी करायची असून त्यात दर आठवड्याला माहिती भरायची आहे.
  • पोर्टलवरून शिक्षक, शाळा, केंद्र, तालुका आणि जिल्हानिहाय शिक्षकांच्या प्रयत्नांचा अहवाल करणार.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: study teaching methods Corona period