पश्चिम हवेलीतील 17 गावांमध्ये सुरु होणार 'ग्राम सुरक्षा यंत्रणा'

gram surksha.jpg
gram surksha.jpg

किरकटवाडी (पुणे) : आपत्कालीन परिस्थितीत जीवित व वित्तहानी टाळण्यासाठी तसेच गरजूंना तातडीने मदत पोहोचविण्यासाठी नाशिक जिल्ह्यासह महाराष्ट्रातील इतर बाराशे गावांमध्ये प्रभावी ठरलेली 'ग्राम सुरक्षा यंत्रणा' पश्चिम हवेलीतील नांदेड, किरकटवाडी, खडकवासला, खानापूर अशा हवेली पोलिस स्टेशन हद्दीतील एकूण 17 गावांमध्ये कार्यान्वित करण्यात येणार आहे. त्यासंबंधीचे प्रशिक्षण ग्रामसेवक, तलाठी, सरपंच व पोलिस पाटील यांना खडकवासला येथील केंद्रीय जल व विद्युत संशोधन केंद्राच्या सभागृहामध्ये देण्यात आले.
     

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

चोरी, दरोडा, महापूर , अपघात किंवा इतर आपत्कालीन परिस्थितीत केवळ एका फोन कॉल वर अनेक लोकांपर्यंत ग्राम सुरक्षा यंत्रणेद्वारे माहिती पोचवता येते. अनेक घटनांमध्ये ग्राम सुरक्षा यंत्रणेचा यशस्वी उपयोग झाल्याने ग्रामनिधीतून ही यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी प्रशासनाने ग्रामपंचायतींना परवानगी दिलेली आहे. ग्राम सुरक्षा यंत्रणेचे संचालक दत्तात्रय गोर्डे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी हवेली पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक अशोक शेळके व ग्रामपंचायत विस्तार अधिकारी नवनाथ कारंडे उपस्थित होते. 
 

ग्राम सुरक्षा यंत्रणा अशी कार्य करते.....
आपत्कालीन परिस्थितीत जो मोबाईल नंबर ग्रामसुरक्षा यंत्रणेशी जोडला गेलेला आहे. त्यावरून संबंधित टोल फ्री क्रमांकावर फोन केल्यानंतर स्वयंचलित यंत्रणा संबंधित फोन कॉल ची खातरजमा करून एका मिनिटाच्या आत मध्ये परिसरातील हजारो लोकांना एकाच वेळी संबंधित फोन कॉलचे रेकॉर्डिंग ऐकवते. जोपर्यंत फोन कॉल उचलला जात नाही तोपर्यंत फोनची रिंग वाजत राहते. सरकारी यंत्रणा व  ग्रामसुरक्षा यंत्रणेशी जोडलेले ग्रामस्थ यांच्या मदतीने आवश्यक ठिकाणी त्वरित मदत उपलब्ध होते.

"आपत्कालीन परिस्थितीसह इतर वेळीही काही महत्त्वाचे संदेश पोहोचवण्यासाठी गाव पातळीवर ग्राम सुरक्षा यंत्रणेचा प्रभावी उपयोग होऊ शकतो. तातडीने गावातील सर्व नागरिकांचे फोन नंबर ग्रामसुरक्षा यंत्रणेशी जोडण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे."

-नवनाथ झोळ, ग्रामसेवक, मालखेड.

 

"कायदा व सुव्यवस्था टिकविण्यासाठी ग्राम सुरक्षा यंत्रणा हे अत्यंत प्रभावी माध्यम आहे. पुणे जिल्ह्यामधील विविध ठिकाणी घडलेल्या मोठमोठ्या दरोड्याच्या घटनांमधील दरोडेखोरांना ग्राम सुरक्षा यंत्रणेमुळे काही तासांमध्ये पकडणे शक्य झाले आहे. नागरिक आणि पोलीस प्रशासन यामधील दुवा म्हणून ग्राम सुरक्षा यंत्रणा प्रभावी ठरत आहे."

-अशोक शेळके, पोलिस निरीक्षक हवेली पोलिस स्टेशन.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com