विद्यार्थी वाहतुकीचा विषय संवेदनशील

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 7 मे 2018

संजय राऊत यांचा "सकाळ'च्या फेसबुक पेजवरून संवाद

पुणे: विद्यार्थी वाहतुकीचा विषय संवेदनशील असून, राज्य सरकारने याबाबत 2011 मध्ये विद्यार्थी वाहतूक नियमावली लागू केली आहे. नियमावलीनुसार चालकाला पाच वर्षांचा अनुभव असणे व त्याचे चारित्र्य प्रमाणपत्र पोलिसांकडून तपासून घेणे बंधनकारक आहे, असे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय राऊत यांनी स्पष्ट केले. रस्ता सुरक्षा पंधरवड्यानिमित्त "सकाळ'च्या फेसबुक पेजवरून राऊत यांनी वाचकांशी संवाद साधला.

विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहनात एक विद्यार्थिनी असली तरीही वाहनात महिला सहायक असणे बंधनकारक आहे, अशी विद्यार्थी वाहतूक करणाऱ्याविषयी नियमावली आहे. वाहनांमध्ये काही त्रुटी असतील तर त्यावर कारवाई केली जाते. वाहनचालक, सहायक व मुख्याध्यापकांचे वेळोवेळी प्रशिक्षण घेऊन प्रबोधन करण्यात येते. प्रबोधनाबरोबरच वाहनांची तपासणीसुद्धा केली जाते.

रस्त्यावरील वाहतुकीच्या समस्येवर बोलताना राऊत म्हणाले, ""1990 पासून केंद्र सरकारने राष्ट्रीय स्तरावर रस्ता सुरक्षा अभियान सप्ताहाच्या माध्यमातून प्रबोधन करत आहे. महाराष्ट्र सरकार पाच वर्षांपासून हे अभियान पंधरा दिवसांसाठी राबवीत आहे.''

"सरकारने सर्व सेवा ऑनलाइन उपलब्ध करून दिल्या आहेत. शिकाऊ लायसन्ससाठी घरबसल्या ऑनलाइन माहिती भरून आपल्याला हवी असलेली वेळ घेता येऊ शकते. शिवाय पैसेही ऑनलाइन भरता येतात. यामुळे प्रत्यक्ष आरटीओ कार्यालयात येण्याची आवश्‍यकता भासत नाही. वाहन चालविण्याच्या सर्व चाचण्या संगणकाद्वारे घेतल्या जात असल्यामुळे मानवी हस्तक्षेप राहात नाही. पारदर्शक चाचणी होते. https://parivahan.gov.in/ या संकेतस्थळावर सर्व प्रकारची माहिती उपलब्ध आहे,'' असेही त्यांनी सांगितले.

आकर्षक क्रमांकासाठी दरसूची
"रस्त्यांवरून कर्णकर्कश हॉर्न वाजविणे मुळात असभ्यपणाचे लक्षण आहे. अत्यंत महत्त्वाचे काम असेल तरच हॉर्नचा वापर करावा, असा संकेत आहे. परंतु, मानसिक नैराश्‍य अथवा घाईतून अनेक जण हॉर्न वाजवतात. हॉर्न न वाजवता वाहन चालवत असाल तर उत्तम वाहनचालक आहात, असे समजले जाते. वाहनांच्या आकर्षक क्रमांकासाठी शासनाने दरसूची ठरवून दिली आहे. शुल्क भरल्यानंतर 30 दिवसांपर्यंत आरक्षित केलेला क्रमांक ग्राह्य धरला जातो. एकापेक्षा जास्त व्यक्तींनी क्रमांकासाठी बोली लावल्यास जास्त रक्कम भरणाऱ्यास तो क्रमांक दिला जातो. भविष्यात ही प्रक्रिया ऑनलाइन केली जाणार आहे, असेही राऊत यांनी सांगितले.

Web Title: sub regional transport officer sanjay raut facebook live