
राज्यातील बांधकाम व्यावसायिकांच्या संघटनांच्या प्रतिनिधींनी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची भेट घेऊन कोरोनामुळे निर्माण झालेली आर्थिक परिस्थिती विचारात घेऊन मुद्रांक शुल्कात कपात करण्याची मागणी केली होती.
पुणे : नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाकडून दस्त नोंदणीची सुविधा डिसेंबर महिन्यातील शनिवारी आणि सुटीच्या दिवशी सुरू ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे दुय्यम निबंधक कार्यालय दस्त नोंदणीसाठी सुरू राहणार आहेत.
राज्य सरकारने डिसेंबर 2020 मुद्रांक शुल्कात सवलत जाहीर केली आहे. या सवलतीचा जास्तीत जास्त नागरिकांना लाभ मिळावा यासाठी दस्त नोंदणीची सुविधा पुणे ग्रामीण जिल्ह्यातील सर्व दुय्यम निबंधक कार्यालये डिसेंबर महिन्यातील शनिवार आणि सुटीच्या दिवशी सुरू ठेवण्यात येणार आहेत. या संधीचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन सह जिल्हा निबंधक वर्ग-1 तथा मुद्रांक जिल्हाधिकारी दीपक पाटील यांनी केले आहे.
- रावसाहेब दानवेंना घरात घुसून फटकवलं पाहिजे; बच्चू कडूंचा घणाघात
राज्यातील बांधकाम व्यावसायिकांच्या संघटनांच्या प्रतिनिधींनी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची भेट घेऊन कोरोनामुळे निर्माण झालेली आर्थिक परिस्थिती विचारात घेऊन मुद्रांक शुल्कात कपात करण्याची मागणी केली होती. बांधकाम व्यावसायिकांच्या संघटनांची मागणीचा विचार करून राज्य सरकारने डिसेंबरअखेरपर्यंत मुद्रांक शुल्कात तीन टक्के तर, मार्च 2021 पर्यंत दोन टक्के सवलत देण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाचे बांधकाम क्षेत्रातून स्वागत करण्यात आले होते. यामुळे सदनिकांचे दर कमी होण्यास मदत होणार आहे. या सवलतीचा लाभ सदनिका खरेदीदारांना होणार आहे.
- PM मोदींनी शेतकऱ्यांची 'मन की बात' ऐकली नाही तर बळीराजा रेल्वे ट्रॅकवर उतरणार
जानेवारी ते मार्च 2021 मध्ये मुद्रांक शुल्कात दोन टक्के सवलत देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे पुणे शहरात तीन टक्के मुद्रांक शुल्क आणि एक टक्का सेस असा चार टक्के मुद्रांक शुल्क भरावे लागणार आहे. तर, ग्रामीण भागात दोन टक्के मुद्रांक शुल्क आणि एक टक्का जिल्हा परिषद कर असा एकूण तीन टक्के मुद्रांक शुल्क आकारला जाणार आहे.
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
(Edited by: Ashish N. Kadam)