
शेतकरी कुंटूबातील लक्ष्मण डोईफोडे हे २६ वर्षापासून भारतीय सैन्य दलामध्ये कार्यरत असून देशसेवा करीत आहेत. त्यांनी तीन वेळा सेवा वाढवून घेतली.
वालचंदनगर (पुणे) : बोराटवाडी (ता.इंदापूर) येथील सुभेदार लक्ष्मण सतू डोईफोडे यांना आसाममध्ये वीरमरण आल्याने इंदापूर तालुक्यावरती शोककळा पसरली. सुभेदार डोईफोडे हे भारतीय सैन्य दलात आसाममध्ये कार्यरत होते. मंगळवार (ता.२३) रोजी ड्युटीवरती असताना भारतीय जवानांची गाडी दरीमध्ये कोसळ्याने दोन जणांचा मृत्यू झाला. यामध्ये डोईफोडे यांचा समावेश आहे.
- काश्मीरमध्ये 4 दहशतवाद्यांना कंठस्नान; सुरक्षा दलाचे मोठे यश
शेतकरी कुंटूबातील लक्ष्मण डोईफोडे हे २६ वर्षापासून भारतीय सैन्य दलामध्ये कार्यरत असून देशसेवा करीत आहेत. त्यांनी तीन वेळा सेवा वाढवून घेतली. ते दोन महिन्यांपूर्वीच बाेराटवाडी गावी सुट्टीसाठी आले होते. सुमारे २५ दिवस ते गावी होते. ड्युटीवरती जाताना गावातील सर्व नागरिकांना ते भेटून गेले होते. त्यांच्या पाठीमागे आई छबुताई, वडील सतू, पत्नी सरिता, मुलगा चेतन (२० वर्षे) आणि मुलगी वैष्णवी (१२ वर्षे) असा परिवार आहे. सुभेदार लक्ष्मण डोईफोडे यांच्या मृत्युमुळे इंदापूर तालुक्यावरती शोककळा पसरली आहे. शुक्रवार (ता.२६) रोजी त्यांचे पार्थिव बाेराटवाडी मूळ गावी आणण्यात येणार असून त्याच दिवशी अंत्यविधीही करण्यात येणार असल्याची माहिती जवळच्या नातेवाईकांनी दिली.
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
(Edited by: Ashish N. Kadam)