Rahul Gandhi Pune : राहुल गांधींवर बायोपिक करणार : सुबोध भावे

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 5 एप्रिल 2019

 “राहुलजी मला अनेकजण म्हणतात की मी तुमच्यासारखा दिसतो,'' असे सुबोध म्हणल्यावर तेव्हा राहुल म्हणाले, ‘’ तसे नाही उलट आहे, मीच तुमच्यासारखा दिसतो.’’ 

पुणे : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी पुण्यातील महालक्ष्मी लॉन्स येथे विद्यार्थ्यांशी सवांद साधण्यास सुरवात केली. यावेळी मराठी अभिनेता सुबोध भावेचीही व्यासपीठावर उपस्थिती होती.

 “राहुलजी मला अनेकजण म्हणतात की मी तुमच्यासारखा दिसतो,'' असे सुबोध म्हणल्यावर तेव्हा राहुल म्हणाले, ‘’ तसे नाही उलट आहे, मीच तुमच्यासारखा दिसतो.’’ 

यावेळी बोलताना सुबोध भावेने सांगितले की, ''राहुल गांधी यांच्याकडे बघून वाटायचे की हा माणूस फक्त राजकारण करत असेल पण राजकारणाच्या पलीकडे जाऊन हा माणूस खूप काही गोष्टी करतो. राहुल गांधी हे  प्रोफेशनल स्कुबा डायव्हर, कराटे ब्लॅक बेल्ट आणि पायलट आहेत. आज त्यांच्यासोबत बोलल्यावर हे कळले आणि मी त्यांचा फॅन झालो,'' असे मत सुबोधने व्यक्त केले.

दरम्यान, राहुल गांधी यांच्या कार्यक्रमाला सध्या शेकडो उपस्थिती असून विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे.

Web Title: Subodh bhave wishes to do a biopic on Rahul Gandhi