कष्टकऱ्यांच्या घरात अवतरणार "देवदूत' 

कष्टकऱ्यांच्या घरात अवतरणार "देवदूत' 

पुणे-  ""आईवडील दोघेही अशिक्षित. वडील नांदेड जिल्ह्यातील किनवटच्या आठवडी बाजारात फुटाणे विकून घर चालवतात. त्यांनी रामप्रसादला शिक्षणासाठी पुण्यात पाठवले आणि त्याने संधीचे सोने केले. "नीट'मध्ये त्याने तब्बल 626 गुण मिळविले. 

परभणी जिल्ह्यातील मातपुरी गावची ऋतुजा मुळगीर ही कुटुंबासमवेत 2009 मध्ये पुण्यात स्थलांतरित झाली. तिचे वडील खराडीत वॉचमन म्हणून काम करतात. ऋतुजाने दोन वर्षे कष्ट करून "नीट'मध्ये 602 गुण मिळविले आहेत. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

भाग्यश्री लोखंडे हिचे वडील अप्पा बळवंत चौकातील एका प्रिंटिंग प्रेसमध्ये काम करतात. तिने 619 गुण मिळविले आहेत. तर ओंकार गोयर आणि दिशा गोयर या दोघा सख्ख्या भावंडांनी अनुक्रमे 552 व 508 गुण मिळविले. त्यांचे वडील एका खासगी कार्यालयात सेवक म्हणून कार्यरत आहेत. 

अशी जवळपास 15 कष्टकऱ्यांची पोरं त्यांचे कुटुंब, नातेवाइकांमधून पहिले डॉक्‍टर होणार आहेत. हे त्यांचे स्वप्न साकार करण्यासाठी हातभार लावला तो "लिफ्ट फॉर अप्लीपमेंट' (एलएफयू) संस्थेच्या माध्यमातून बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयातील प्रशिक्षणार्थी डॉक्‍टरांनी. 

महाराष्ट्रातील बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

डॉक्‍टर व्हायचे म्हटल्यावर आधी "नीट' ही महाकठीण परीक्षा उत्तीर्ण होणे गरजेचे असते. त्यासाठी क्‍लासला लाखो रुपयांचा खर्च येतो. त्यामुळे अनेक गुणवंत; पण गरीब विद्यार्थी डॉक्‍टर होण्याचे स्वप्नही बघत नाहीत. अशाच विद्यार्थ्यांना मोफत मार्गदर्शन करून त्यांचे प्रवेश शासकीय महाविद्यालयातच व्हावेत, यासाठी बी. जे. मधील जवळपास 250 प्रशिक्षणार्थी डॉक्‍टरांची टीम झटत आहे. पुण्यात मार्गदर्शन घेणाऱ्या 40 पैकी 17 जणांनी, तर मेळघाट शाखेतील 10 आदिवासी विद्यार्थ्यांनी "नीट'मध्ये यश मिळविले आहे. 

रामप्रसाद जुनागरे म्हणाला, ""दहावीत मला 94 टक्के मिळाले. त्यानंतर पुण्यात फर्ग्युसन महाविद्यालयात प्रवेश घेतला. महापालिकेच्या आंबेडकर वसतिगृहात राहत असताना "एलएफयू'ची माहिती मिळाली. तेथे अभ्यास सुरू केल्यानंतर डॉक्‍टरांनी मार्गदर्शन व्यवस्थित केल्यानेच हे यश मिळाले. मी माझ्या कुटुंबात डॉक्‍टर होणारा पहिलाच असेल याचा माझ्या आईवडिलांना अभिमान आहे. एमबीबीएस पूर्ण झाल्यानंतर मेंदू विकारतज्ज्ञ होण्याचे स्वप्न आहे. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

बीजे वैद्यकीय महाविद्यालयातील जवळपास 250 विद्यार्थी "एलफयू'मध्ये काम करतात. सराव पेपरची जबाबदारी डॉ. तन्वी शिंगवी यांच्याकडे होती. यंदा त्यांनी सराव परीक्षेत घेतलेले अनेक प्रश्‍न मुख्य परीक्षेत विचारले गेले. त्यामुळे विद्यार्थ्यांना यश मिळाले. गरीब विद्यार्थ्यांना "एलएफयू'च्या माध्यमातून मोठी झेप घेता येत आहे, याचे समाधान आहे. 
 डॉ. तेजस अहिरे, सदस्य, "एलएफयू' 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

"एलएफयू'चे विद्यार्थी व गुण 
दीक्षा सिंग - 608 
शिरीष कामठे - 595 
रिया दास - 592 
अजिंक्‍य चोरमाळे - 584 
स्नेहा आंधळे - 562 
राजेश शिंदे - 559 
सोहम धावारे - 558 
रोहन जाधव - 544 
गार्गी राऊत - 538 
मधुरा भालेराव- 531 
रमेश बोराटे - 522 
वैष्णवी चिंधे - 519 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com