नायट्यामुळे मरणासन्न महिलेवर उपचार 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 5 डिसेंबर 2018

पिंपरी - नायट्यामुळे (फंगल इन्फेक्‍शन) शरीरावर झालेल्या जखमा..., घटलेले वजन.., हिमोग्लोबिनचे कमी झालेले प्रमाण.. बोलण्यात येणाऱ्या अडचणी, अशा मरणासन्न अवस्थेतील 40 वर्षीय महिलेवर यशस्वी उपचार करण्यात डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयातील डॉक्‍टरांना यश आले. महिनाभराच्या उपचारानंतर ती आता बरी होऊन घरी परतली आहे. 

पिंपरी - नायट्यामुळे (फंगल इन्फेक्‍शन) शरीरावर झालेल्या जखमा..., घटलेले वजन.., हिमोग्लोबिनचे कमी झालेले प्रमाण.. बोलण्यात येणाऱ्या अडचणी, अशा मरणासन्न अवस्थेतील 40 वर्षीय महिलेवर यशस्वी उपचार करण्यात डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयातील डॉक्‍टरांना यश आले. महिनाभराच्या उपचारानंतर ती आता बरी होऊन घरी परतली आहे. 

सकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा

पिंपरीतील महिलेला सप्टेंबरमध्ये उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले होते. ऑक्‍टोबरअखेर तिला यशस्वी उपचारानंतर घरी सोडले. उपचारासाठी दाखल केले तेव्हा तिची परिस्थिती अतिशय गंभीर होती. तिचा चेहरा, मान आणि छातीवर नायट्यामुळे (फंगल इन्फेक्‍शन) छोट्या-छोट्या जखमा झाल्या होत्या. जखमांतून पू (पस) बाहेर पडत होता. तिचे वजनही खूपच कमी झाले होते. आजारामुळे बोलणे आणि चालणेही कठीण झाले होते. जिवालाही धोका निर्माण झाला होता. 

डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयात तिला उपचारासाठी दाखल केल्यानंतर त्वचारोग विभागप्रमुख डॉ. नीता गोखले यांच्या नियंत्रणाखाली डॉ. श्रिया कपूर, साक्षी सितानिया, त्वचारोगतज्ज्ञ अजयकुमार यांनी उपचार केले. प्रथम तिला क्षयरोग झाल्याची शक्‍यता वाटली. त्यामुळे डॉक्‍टरांनी त्या दिशेने उपचाराला सुरवात केली. क्षयरोगासंदर्भातील सर्व चाचण्या घेण्यात आल्या. मात्र, क्षयरोग नसल्याचे निदान झाले. संसर्ग झालेल्या त्वचेचा नमुना चंदीगड येथील पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल एज्युकेशन ऍड रिसर्च येथे तपासणीसाठी पाठविण्यात आला. त्या वेळी तिला "एक्‍झोफियला स्पिनिफेरा' हे दुर्मीळ प्रकारचे फंगल इन्फेक्‍शन झाल्याचे स्पष्ट झाले. 

"एक्‍झोफियला स्पिनिफेरा' हे दुर्मीळ प्रकारचे फंगल इन्फेक्‍शन त्या महिलेला झाले होते, त्यामुळे आम्हाला तिची काळजी वाटत होती. तिला कुटुंबीयांकडून मदत होत नव्हती. आम्ही तिच्यासाठी मोफत औषधे उपलब्ध करून दिली. सध्या तिची प्रकृती खूप सुधारली आहे, याचा आम्हाला खूप खूप आनंद होतो आहे. 
- डॉ. श्रिया कपूर, डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालय, पिंपरी 

Web Title: Success of the doctors of D. Y. Patil Hospital