विद्यामंदिराच्या आवारात आलेल्या बिबट्याला पकडण्यात यश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Leopard

सोमवारी (ता. १९) पहाटे वारूळवाडी परिसरात धुमाकूळ घालणारी बिबट्याची मादी येथिल सुरेश वऱ्हाडी यांच्या शेतात लावलेल्या पिंजऱ्यात अडकली होती.

विद्यामंदिराच्या आवारात आलेल्या बिबट्याला पकडण्यात यश

नारायणगाव - वारूळवाडी( ता. जुन्नर) येथील गुरुवर्य रा. प. सबनीस विद्या मंदिराच्या आवारात आलेल्या बिबट्याला चार तासाच्या अथक प्रयत्नानंतर आज सायंकाळी सहा वाजता वन विभागाच्या रेसिक्यु पथकाने जाळी लावून शिताफीने पकडले. हा बिबट्या सुमारे एक वर्ष वयाचा आहे. त्याला आज सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास माणिकडोह येथील निवारा केंद्रात दाखल करण्यात आले.

या बाबत माहिती अशी, सोमवारी (ता. १९) पहाटे वारूळवाडी परिसरात धुमाकूळ घालणारी बिबट्याची मादी येथिल सुरेश वऱ्हाडी यांच्या शेतात लावलेल्या पिंजऱ्यात अडकली होती. या ठिकाणा पासूनच सुमारे अर्धा किलोमीटर अंतरावर असलेल्या गुरुवर्य रा. प. सबनीस विद्या मंदिराच्या आवारात आज दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास बिबट्याने प्रवेश केला. येथील मुलींच्या वसतिगृहा जवळ असलेल्या गवतात या बिबट्या विद्यार्थ्यांनी पहिला.विद्यार्थ्यांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले.

याबाबतची माहिती वनविभागाला दिल्यानंतर वन विभागाचे रेसिक्यु पथक घटनास्थळी दाखल झाले. सुरक्षेततेच्या कारणास्तव विद्यार्थ्यांना शाळेतून घरी सोडण्यात आले. त्यानंतर रेसिक्यु पथकातील पंचवीस सदस्यांनी जाळी लावून बिबट्या पकडण्याची मोहीम सुरू केली. सुमारे चार तास बिबट्या पथकाला चकवा देत होता. सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास बिबट्या जाळीत अडकला.वनक्षेत्रपाल अजित शिंदे, माणिकडोह येथील बिबट रेस्क्यू केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. चंदन सनवे, महेंद्र ढोरे, वनपाल नितीन विधाटे, बिबट रेस्क्यू सदस्य किरण वाजगे, रुपेश जगताप, संकेत बोंबले, वनरक्षक नारायण राठोड, कल्याणी पोटवडे, स्वरूप रेगडे, संजय गायकवाड, अविनाश जाधव, बेले, पंढरी भालेकर, सलीम शेख, आकाश डोळस, वन कर्मचारी यांनी या मोहिमेत भाग घेतला.त्या नंतर वनविभागाच्या व्हॅनमधून बिबट्याला मणिकडोह निवारा केंद्रात हलवण्यात आले.

पिंजरा लावण्याची मागणी -

या भागात बिबट्याची संख्या वाढली आहे. ग्रामोन्नती मंडळाच्या विविध विभागात केजी ते पीजी पर्यतचे सुमारे सहा हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. आज बिबट्या थेट शाळेच्या आवारात आल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. संभाव्य धोका विचारात घेऊन या भागातील बिबटे पकडण्यासाठी वनविभागाने पिंजरा लावावा. अन्य उपाययोजना कराव्यात अशी मागणी ग्रामोन्नती मंडळाचे कार्याध्यक्ष अनिल मेहेर यांनी केली आहे.

Web Title: Success In Capturing Leopard Came In Premises Of Sabnis Vidyamandir

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :puneLeopard