राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेममध्ये भारत चिल्ड्रेन्स अॅकॅडमीला यश

राजकुमार थोरात 
बुधवार, 20 जून 2018

वालचंदनगर : वालचंदनगर (ता.इंदापूर) येथील भारत चिल्ड्रेन्स अॅकॅडमी शाळेतील विद्यार्थ्यांनी राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेमध्ये यश मिळविले आहे. 
महाराष्ट्र राज्य बॉक्सिंग असोसिएशनने ठाणे येथे नुकत्याच मुलींच्या राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेचे आयोजन केले होते. यामध्ये सादिया शेख या विद्यार्थीनीने ६० किलो वजन गटामध्ये सुवर्णपदक, आदिती मासाळने ५० किलो वजन गटामध्ये रजत पदक, अपेक्षा रणसिंग ने ४० किलो वजन गटामध्ये व जिज्ञासा पाठमास  ने ४६ किलो वजन गटामध्ये कांस्यपदक पटकावले. 

मुलांच्या स्पर्धा लोणीकाळभोर येथे पार पडल्या. यामध्ये दिपक वाघ याने ५२ किलो वजन गटामध्ये कांस्यपदक पटाकावले. सर्व विद्यार्थ्यांना शाळेचे प्राचार्य व बॉक्सर कृष्णदेव क्षीरसागर, पर्यवेक्षक अमोल गोडसे, ज्ञानेश्‍वर जगताप, प्रचना माळशिकारे यांनी मार्गदर्शन केले. वालचंदनगर कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी जी.के.पिल्लई, मनुष्यबळ विभागाचे वरिष्ठ अधिकारी आनंद नगरकर, शाळा समितीचे अध्यक्ष धीरज केसकर, उपाध्यक्ष पांडुरंग कवडे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

Web Title: The success of the India Children's Academy in state-level boxing competition