esakal | Success Story : 4 हजार 500 शेतकरी, वर्षाला करतात 100 कोटींची उलाढाल
sakal

बोलून बातमी शोधा

Every year 4500 farmers sell vegetables worth Rs 100 crore told PM Modi in Man ki Baat

शहरातील नागरिकांकडून या शेतकरी आठवडी बाजारास प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. कोरोनाच्या परिस्थितीतही कंपनीने योग्य ती काळजी घेऊन शेतकरी गटांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात शेतमालाच्या विक्रीचे नियोजन पार पाडले. शेतकऱ्यांना उत्पादनाचा योग्य भाव मिळण्याबरोबरच मोठ्या प्रमाणात सुशिक्षित ग्रामीण युवकांना व महिलांना रोजगाराची संधी यातून उपलब्ध होत आहे. 

Success Story : 4 हजार 500 शेतकरी, वर्षाला करतात 100 कोटींची उलाढाल

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे : शेतकऱ्यांचा भाजीपाल थेट ग्राहकांपर्यंत पोचविणाऱ्या पुण्यातील श्री स्वामी समर्थ शेतकरी कंपनी पुणे आणि मुंबईत तब्बल 1 लाख 60 हजार ग्राहकांपर्यंत रोज पोचत असून त्यातून दरवर्षी 100 कोटी रुपयांपर्यंतची त्यांची उलाढाल होते. त्यामुळे 4 हजार 500 शेतकऱ्यांना थेट फायदा होत आहे. म्हणूनच या कंपनीची दखल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी "मन की बात'मध्ये घेतली अन त्यामुळे एक प्रेरक कथाही राष्ट्रीय स्तरावर झळकली ! 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पुणे, मुंबईमध्ये शेतमाल विक्रीसाठी सुरू करण्यात आलेल्या आठवडे बाजारात पुणे आणि नगर जिल्ह्यातील शेतकरी थेट शेतमालाची विक्री करत आहे. त्यासाठी पुण्यातील श्री स्वामी समर्थ शेतकरी उत्पादक कंपनी गेल्या सहा वर्षांपासून ही संकल्पना पुणे व मुंबई शहरात राबवत आहेत. जवळपास 4,500 शेतकरी व 750 तरुण युवक मिळून वार्षिक 100 कोटी रुपयांचा ताजा, स्वच्छ व निवडक शेतमाल या संकल्पनेतून थेट उत्पादकांकडून 1 लाख 60 हजार ग्राहकांना रास्त किमतीत विक्री करत आहेत. म्हणूनच मंजूर झालेल्या कृषी विधेयकांमुंळे शेतकऱ्यांना कसा फायदा होणार आहे, हे सांगत पंतप्रधान मोदी यांनी "स्वामी समर्थ' कंपनीची दखल घेतली. 

शहरातील नागरिकांकडून या शेतकरी आठवडी बाजारास प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. कोरोनाच्या परिस्थितीतही कंपनीने योग्य ती काळजी घेऊन शेतकरी गटांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात शेतमालाच्या विक्रीचे नियोजन पार पाडले. शेतकऱ्यांना उत्पादनाचा योग्य भाव मिळण्याबरोबरच मोठ्या प्रमाणात सुशिक्षित ग्रामीण युवकांना व महिलांना रोजगाराची संधी यातून उपलब्ध होत आहे. 

पुण्यातल्या कोविड सेंटरमधून बेपत्ता झालेली तरुणी सापडली

शेतकरी उत्पादक कंपनीने काटेकोर व्यवस्थापनातून शेतकरी आठवडी बाजाराच्या यंत्रणा उभ्या केल्या आहेत. ग्रामीण भागात संकलन प्रतवारी केंद्रे उभी करणे, शेतकऱ्यांच्या स्वतःच्या वाहतूक व्यवस्था उभ्या करणे, आधुनिक तसेच ग्राहकभिमुक पॅकेजिंग व हाताळणी व्यवस्था, बाजार ठिकाण स्वच्छता व टापटीपपणा, शेतकरी आठवडी बाजारांच्या जागांचे व्यवस्थापन, मागणी पुरवठा योग्य समतोल धोरण त्यामुळे शेतमालाच्या नासाडीवर नियंत्रण, कायदेशीर बाबींची पूर्तता इत्यादी बाबी शेतकरी उत्पादन कंपनी स्वतःच्या यंत्रणे मार्फत राबवते. त्यातून शेतमालाच्या दरात स्थिरता व एकसूत्रीपणा आला आहे. 

श्री स्वामी समर्थ शेतकरी कंपनीचे अध्यक्ष नरेंद्र पवार म्हणाले, "नैसर्गिक पद्धतीने शेती करण्यासाठी बाजारातील ओल्या कचऱ्याचा वापर केला जातो. त्यातून शासकीय यंत्रणेवर येणारा ताण कमी होतो. शेतकरी कंपन्यांनी नियमावली शेतकरी-ग्राहक हित जोपासत शेतकरी आठवडी बाजाराची कार्यपद्धती उभारली आहे.'' 

पुणे : जम्बो कोविड सेंटरमधली तरुणी पिरंगुटच्या घाटात पोहोचली कशी?