
कडूस (जि. पुणे): शेतीच्या उन्हाळी हंगामात घेतली जाणारी पारंपरिक पिकांचा मार्ग सोडून एका तरुण शेतकऱ्याने कलिंगडाचे पीक घेऊन यशस्वी प्रयोग केला आहे. खेड तालुक्यातील कडूस-टोकेवाडी येथील अरुण पोपट शिंदे या तरुण शेतकऱ्याने शेतीच्या पारंपरिक पद्धतीला छेद दिली आणि मेहनत, आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने एकरी २५ टन उत्पादन करून दाखवले.