आकांक्षांपुढती जिथे गगन ठेंगणे! ग्रामीण भागातील तरुण करतोय महागड्या गाड्यांचे इंटेरियर डिझायनिंग

अमित हे चीनमधील यानफेंग ग्लोबल ऑटोमोटिव्ह या जग्वार, लँड रोव्हर आणि टेस्ला अशा महागड्या कंपन्यांचे डिझायनिंग करणाऱ्या कंपनीत इंटेरियर डिझायनिंगचे काम करतात
success story Rural youth are doing interior designing of expensive cars business pune
success story Rural youth are doing interior designing of expensive cars business punesakal

पुणे : ‘‘बॅचलर इन आर्किटेक्चर करीत असताना वडील वारले. त्यानंतर वर्षातच आर्इचेही निधन झाले. त्यांच्या अल्पबचतीवर आम्ही दोघे भाऊ आणि बहिणी यांचे शिक्षण झाले. जेमतेम आर्थिक परिस्थिती आणि इंग्रजीचे तोकडे ज्ञान. त्यात वडिलांचा व्यवसाय सांभाळायचा की कॉलेज करायचे असा प्रश्‍न माझ्यासमोर होता. मात्र मी शिक्षणाला पसंती देत प्रवास सुरू केला आणि ध्येय गाठले. ग्रामीण भागातून आलो असलो तरी काय करायचे हे माझे स्पष्ट होते. त्यामुळेच मी आज जगातील महागड्या कारचे इंटेरियर डिझायनिंग करण्याचे काम समर्थपणे पेलत आहे,’’ असा आनंद व्यक्त केला अमित पाटणकर यांनी.

अमित हे चीनमधील यानफेंग ग्लोबल ऑटोमोटिव्ह या जग्वार, लँड रोव्हर आणि टेस्ला अशा महागड्या कंपन्यांचे डिझायनिंग करणाऱ्या कंपनीत इंटेरियर डिझायनिंगचे काम करतात. ते कंपनीत उत्तर अमेरिका विभागाचे प्रमुख आहेत. गेल्या आठ वर्षांपासून अमेरिकेतच स्थायिक असलेले अमित हे मुळचे सांगली शहरातील शिवाजीनगर या भागातील. अमित यांचे वडील मुकुंद पाटणकर हे दूधविक्रीचा व्यवसाय करायचे. तर त्यांची आर्इ वृंदा या साड्यांना पिको फॉलकरून पतीला संसारात हातभार लावायच्या. ते पदवीचे शिक्षण घेत असताना वडील आणि त्यानंतर एकाच वर्षात आर्इचाही आजारपणाने मृत्यू झाला. या दुःखातून सावरत त्यांनी बॅचलर इन आर्किटेक्चरमध्ये देदीप्यमान यश मिळवले. त्यानंतर त्यांना जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्समध्ये पुढील शिक्षण घ्यायचे होते. मात्र आर्थिक स्थितीमुळे ते शक्य झाले नाही.

परिस्थितीने घडवले

़़आर्इ-वडिलांचे छत्र हरवले की मुलं वार्इट मार्गाला लागल्याची अनेक उदाहरणे आम्ही भावंडांनी पाहिली आहेत. मात्र सुदैवाने आमच्याबाबत तसे काही झाले नाही. तेव्हा निर्माण झालेल्या परिस्थितीने आम्हाला घडवले. माझा भाऊ हेमंत सध्या ऑस्ट्रेलियामध्ये सनदी लेखापाल आहे. तर बहीण अश्विनी नदाफ या सरकारी अधिकारी आहेत. आपल्याला काय करायचे हे स्पष्ट असेल तर ध्येय गाठणे सोपे होते. त्यात पैशांची कमतरता आणि भाषेची अडचण येत नाही,’’ असे पाटणकर यांनी सांगितले.

सव्वीस पेटंट मिळवली

पाटणकर यांनी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईनमध्येही शिक्षण घेतले आहे. आता ते त्याच इन्स्टिट्यूटमध्ये लेक्चर देण्यासाठी जातात. हे देशातील अत्यंत नामांकित इन्स्टिट्यूट आहे. अमित यांना xim20 या संकल्पना कारसाठी सर्वोत्कृष्ट डिझाइन संकल्पनेबाबत रेड डॉट डिझाइनसह चार मानाच्या पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. विशेष म्हणजे त्यांनी १३ आंतरराष्ट्रीय, यूएसमधील सात, जागतिक दर्जाची तीन आणि चीनमधील तीन पेटंट मिळवली आहेत.

आर्किटेक्चरचे शिक्षण झाल्यानंतर मी सांगलीत काही काळ अर्धवेळ नोकरी केली. त्यानंतर काही काळाने पुण्यात एका स्टार्टअपमध्ये नोकरी लागली. तेथून टाटा एलिक्सी कंपनीत रुजू झालो. तेव्हा मला कंपनीने २००७ मध्ये जर्मनीत पाठवले. विमानाने केलेला तो माझा पहिलाच प्रवास होता. त्यानंतर अनेक मोठ्या संधी मिळत गेल्या. मी आतापर्यंत चीन, अमेरिका, जर्मनी या देशांत काम केले आहे.

- अमित पाटणकर, इंटेरियर डिझायनर, यानफेंग ग्लोबल ऑटोमोटिव्ह

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com