
भारतीय सैन्य दलात जाण्याचे स्वप्न उराशी बाळगलेल्या पुण्याच्या ऋतुजा वऱ्हाडेने एनडीएच्या परीक्षेत देशात पहिला क्रमांक मिळवला आहे. एनडीएने 75 वर्षात पहिल्यांदाच मुलींना सैन्य दलाची दार खुली केली आहेत. याच संधीचं सोनं ऋतुजाने केले आहे. यंदा दीड लाख मुलींनी एनडीएची परीक्षा दिली. यात पुण्याच्या ऋतुजा वऱ्हाडे ही देशात पहिला येण्याचा क्रमांक पटकावला आहे. यामुळे सर्वत्र तिचे कौतुक होत आहे.