Manoj Jarange: मनोज जरांगेंच्या स्वागतासाठी शिवाजीनगरमध्ये जय्यत तयारी

मराठा आरक्षणासाठी जरांगेंची यात्रा मुंबईच्या दिशेनं मार्गस्थ झाली.
Pune
Pune

शिवाजीनगर : मराठ्यांना आरक्षण मिळावं म्हणून आंतरवाली सराटी ते मुंबई अशी सकल मराठा समाजाची पदयात्रा जात आहे. ही यात्रा शिवाजीनगरहून पुढे मुंबई-पुणे हायवेवरुन लोणावळ्याकडं मार्गस्थ झाली. यावेळी त्यांच्या स्वागतासाठी शिवाजीनगर इथं जय्यत तयारी करण्यात आली होती.

मंगळवारी (ता.२३) पाच वाजता वाघोली इथं जरांगेंची सभा झाली, तिथं विश्रांती घेऊन आज बुधवार (ता.२४) ही पदयात्रा मुंबईकडे निघाली. ही यात्रा शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातून संचेती हॉस्पिटल, गणेशखिंड रस्ता मार्गे, विद्यापीठ चौकातून पुढे मुंबईच्या दिशेने जाणार आहेत. यानिमित्त चौकाचौकात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात संचेती हॉस्पिटल चौकामध्ये स्वराज्य संघटनेच्यावतीनं क्रेनच्या साहाय्याने हार घालण्याची तयारी केली. पदयात्रेत सहभागी असलेल्या मराठा बांधवांना पाण्याची बाटल्यांचं मोफत वाटप करण्यात येत आहे.

सकल मराठा समाज शिवाजीनगर यांच्यावतीनं गणेश खिंड रस्त्यावर सेंट्रल मॉल इथं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मुर्तीला पुष्पहार अर्पण करून मशाल पेटवण्यात आली. यावेळी उदय महाले, बाळासाहेब बोडके, संदीप काळे, बाळा दरवडकर, अजय शिंदे, युवराज दिसले, संजय काळे, रागिणी आमराळे, नीलम पवार, नंदिनी बांदल, दिलीप शेळके, जितेंद्र कोंढारे आदी मराठा समाजातील बांधव उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com