
Khadakwasla Dam
Sakal
खडकवासला : खडकवासला धरणातून रविवारी (ता. २१) दुपारी अचानक पाणी सोडण्यात आले. यामुळे नदीपात्रात गेलेले अनेक नागरिक, महिला व लहान मुले पाण्यात अडकली. या घटनेत निष्काळजीपणा झाल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला असून, संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.