साखर निर्यातीसाठी डिसेंबरपर्यंत मुदतीची मागणी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 23 जून 2018

भवानीनगर - साखर निर्यातीसाठी असलेली सप्टेंबरपर्यंतची मुदत डिसेंबरपर्यंत करावी व निर्यातीच्या साखरेचे प्रमाण ६० लाखांनी वाढवून ८० लाख टन करावे, अशी मागणी राष्ट्रीय साखर संघाने केंद्राकडे केली. राष्ट्रीय साखर संघाचे अध्यक्ष दिलीप वळसे पाटील व व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे यांनी केंद्रीय अन्न सचिव रविकांत व प्रमुख साखर संचालक साहू यांची नवी दिल्ली येथे भेट घेतली. केंद्र सरकारने साखर उद्योगाने केलेल्या पाठपुराव्याची दखल घेत साखरेचे कारखानानिहाय दर, ३० लाख टनांचा बफर स्टॉक अशा घेतलेल्या निर्णयाबद्दल राष्ट्रीय साखर संघाच्या वतीने केंद्र सरकारचे आभार मानले.

Web Title: sugar export