थकीत एफआरपीमुळे साखर कारखान्यांना मोठा धक्का; अडकले गाळप परवाने

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 18 डिसेंबर 2019

राज्यात यंदाच्या गाळप हंगामाला सुरवात होऊन 27 दिवस झाले; तरी 17 साखर कारखान्यांचे गाळप हंगाम सुरू करण्याबाबतचे प्रस्ताव त्रुटींअभावी अडकले आहेत. शेतकऱ्यांची एफआरपी रक्‍कम आणि शासकीय भागभांडवलाची रक्‍कम थकविल्यामुळे या कारखान्यांना अद्याप गाळपाचा परवाना मिळालेला नाही.

पुणे : राज्यात यंदाच्या गाळप हंगामाला सुरवात होऊन 27 दिवस झाले; तरी 17 साखर कारखान्यांचे गाळप हंगाम सुरू करण्याबाबतचे प्रस्ताव त्रुटींअभावी अडकले आहेत. शेतकऱ्यांची एफआरपी रक्‍कम आणि शासकीय भागभांडवलाची रक्‍कम थकविल्यामुळे या कारखान्यांना अद्याप गाळपाचा परवाना मिळालेला नाही.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

दरम्यान, राज्यातील 124 कारखान्यांनी गाळप हंगाम सुरू केला असून, आजअखेर 77 लाख क्‍विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. राज्यात यंदाच्या गाळप हंगामाला गेल्या 22 नोव्हेंबरपासून सुरवात झाली. यावर्षी एकूण 163 सहकारी आणि खासगी साखर कारखान्यांनी गाळपासाठी साखर आयुक्‍त कार्यालयाकडे प्रस्ताव पाठविले होते. त्यापैकी अद्याप 17 साखर कारखान्यांना गाळप परवाना मिळालेला नाही. परवाना मिळालेल्या उर्वरित 146 साखर कारखान्यांपैकी 68 सहकारी आणि 56 खासगी अशा एकूण 124 साखर कारखान्यांनी ऊस गाळपाला सुरवात केली आहे.

'ते भगवी वस्त्रे घालतात अन्‌ बलात्कार करतात'

काही साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना गेल्या हंगामातील एफआरपी दिलेला नाही. मुख्यमंत्री सहायता निधीची रक्‍कमही थकवली आहे. तसेच, भागभांडवलाची परतफेड न केल्यामुळे 17 कारखान्यांचे गाळपाचे परवाने रखडले आहेत. हे साखर कारखाने आर्थिक अडचणीत असल्यामुळे एफआरपीची थकीत रक्‍कम देण्यासाठी पैसे नाहीत. या कारखान्यांना बॅंकेकडून कर्ज मिळत नाही. कर्ज मिळाल्याशिवाय एफआरपी देणे अशक्‍य झाले आहे. तसेच, दोन-चार कारखान्यांचा ऊस अन्य कारखान्यांनी पळविला आहे. त्यामुळे ऊसही नाही आणि गाळप परवानाही नाही, अशी स्थिती या कारखान्यांची झाली आहे.

पुरस्कार वापसीला सुरवात; मुजतबा हुसैन 'पद्मश्री' परत करणार 

77 लाख क्‍विंटल साखरेचे उत्पादन
राज्यात आजअखेर साखर कारखान्यांमध्ये 81 लाख 81 हजार मेट्रिक टन उसाचे गाळप करण्यात आले आहे. त्यातून 76 लाख 63 हजार लाख क्‍विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. सरासरी साखरेचे उताऱ्याचे प्रमाण 9.37 टक्‍के इतके आहे.

विभागनिहाय ऊस गाळप स्थिती
विभाग हंगाम सुरू झालेले कारखाने ऊस गाळप (लाख मेट्रिक टन) साखर उत्पादन (लाख क्‍विंटल) उतारा
कोल्हापूर - 32 29.37 30.39 10.35
पुणे 28 23.66 22.69 9.59
सोलापूर 19 8.88 7.34 8.26
नगर 15 11.13 9.24 8.30
औरंगाबाद 16 5.01 3.83 7.65
नांदेड 11 2.88 2.42 8.38
अमरावती 2 0.88 0.72 8.19
नागपूर 1 00 00 00

परवाना न दिलेल्या बहुतांश कारखान्यांनी शेतकऱ्यांची एफआरपी रक्‍कम थकवली आहे. तसेच, शासकीय भागभांडवलाची रक्‍कम अद्याप परत केलेली नाही. एफआरपीची पूर्ण रक्‍कम देणे बंधनकारक आहे. ही रक्‍कम परत केल्यानंतर 24 तासांत त्या कारखान्यांना गाळप परवाना दिला जाईल. कारखान्यांना मुख्यमंत्री सहायता निधी आणि भागभांडवलाची रक्‍कम भरण्यास सवलत दिली आहे.- शेखर गायकवाड, साखर आयुक्‍त


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sugar factories licence are pending due to FRP