

Farmers in Pimparkhed live in fear of leopards.
sakal
संजय बारहाते
पिंपरखेड : सहा हजार लोकसंख्या असलेलं हे गोड ऊसाचं गाव बिबट्यांच्या कडु आठवणीने आज अक्षरशः भीतीच्या गर्तेत जगतंय.पहाटे सूर्य उगवतो, आणि गावकरी पिकांना पाणी द्यायला, जनावरांना चारा आणायला शेतात निघतात. पण प्रत्येक पावलावर मनात एकच प्रश्न “आज परत बिबट्या दिसेल का...?” हे गाव दाभाडे मळा, आंबेवाडी, डोंगरवस्ती, दत्तवाडी, वरे मळा, गायकवाड मळा, पोखरकर मळा, ढोमेमळा अशा अनेक वस्त्यांत विखुरलेलं. प्रत्येक वस्तीत ऊसाचं घनदाट जंगल. या ऊसातून बिबट्यांचे हालचाली रोज दिसतात.