जुन्नर पर्यटनासाठी टॅग लाईन सुचवून व्हा चळवळीत सामील

दत्ता म्हसकर
मंगळवार, 10 एप्रिल 2018

जुन्नर - जुन्नर तालुका विशेष पर्यटन क्षेत्र जाहीर झाल्यानंतर येथील पर्यटन वाढावे यासाठी एक चांगली टॅग लाईन सुचविण्याचे आवाहन जुन्नर पर्यटन विकास संस्थेचे अध्यक्ष मनोज हाडवळे यांनी केले आहे. इंक्रेडीबल इंडिया, अतिथी देवो भव, 
गुजरात-कुछ दिन तो बिताइये गुजरात मे, मध्य प्रदेश- इंडिया का दिल देखो,
राजस्थान-पधारो म्हारो देस, कोकण- येवा, कोकण आपलाच असा, अशा प्रकारच्या टॅग ओळी पर्यटन क्षेत्र असणारे देश, राज्य, जिल्हे यांनी आपापल्या भागातील पर्यटन विकास करत असताना, पर्यटकांना आकर्षित करण्यायासाठी वेगवेगळ्या टॅग लाईन बनवल्या आहेत.

जुन्नर पर्यटन चळवळ आधीपासूनच लोकाभिमुख आहे. त्यामुळे विकासाच्या प्रत्येक टप्प्यावर लोकांचा, स्थानिकांचा तसेच जुन्नरला येणाऱ्या पर्यटकांचा सक्रिय सहभाग हा नेहमीच स्वागतार्ह राहिला आहे. जुन्नरचा पर्यटन विकास होत असताना, त्यासाठी आपणही एखादी आकर्षक, छानशी टॅग लाईन सूचवू शकता. आकर्षक टॅगलाईन सुचविल्याबद्दल आपल्या योगदानासाठी जुन्नर पर्यटन विकास संस्थेकडून आपला यथोचित सन्मान करण्यात येणार आहे. निवडक टॅग लाईन या जुन्नर पर्यटन प्रसिद्ध करताना वापरल्या जातील. 

''चला तर मग, आपली सृजनशीलता लढवूया, जुन्नर पर्यटन चळवळीत सहभागी होऊया. टॅग लाईन इथे कॉमेंट मध्ये लिहा किंवा 09970515438 या क्रमांकावर, आपल्या नावासह वॉट्स अप करा''.
मनोज हाडवळे

Web Title: Suggest a tag line for Junnar tourism and join the movement