sri m
sakal
Suhana Swasthyam 2025 : योगाद्वारे शरीराबरोबर मनाची, आत्म्याची शुद्धता
- श्री एम, आध्यात्मिक योगगुरू
योगविद्येचे मूळ भारतीय असले, तरी त्यातून मिळणारा संदेश हा विश्वव्यापी आहे. योग म्हणजे केवळ आसन करणे नाही. शरीर स्वास्थ्यासाठी योगासने आवश्यकच आहेत, त्याचबरोबर आत्मा आणि मनाच्या शुद्धतेसाठी तो सर्वाधिक महत्त्वाचा आहे. योगामध्ये मोठा गर्भितार्थ दडला आहे, तोच समजून घेण्याची आवश्यकता आहे. हजारो वर्षांची परंपरा असलेल्या योगाबद्दल आध्यात्मिक, योगगुरू श्री एम सांगत होते. ‘सकाळ’ प्रस्तुत ‘सुहाना स्वास्थ्यम्’ उपक्रमांतर्गत श्री एम ‘योग आणि बियाँड’ या विषयावरील व्याख्यानात योगातील मर्म उलगडून दाखवणार आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांच्याशी साधलेला संवाद.
ध्यानधारणा करण्यासाठी कोणत्याही एकांतस्थळी जाण्याची आवश्यकता नाही. आपण आपल्या घरालाच ‘हिमालय’ करू शकतो! कारण तुम्ही आता कोणत्याही धार्मिकस्थळी गेल्यास तिथे प्रचंड गर्दी दिसते. तिथे काय ध्यानधारणा होणार? एकांत, स्वच्छ वातावरण असलेल्या ठिकाणी वर्षातून एकदा दहा दिवसांसाठी जायला हरकत नाही, मात्र कायमस्वरूपी ध्यानधारणा करण्यासाठी घराला ‘हिमालय’ करण्यास पर्याय नाही...
