पुणे: खासगी गोष्टी शेअर केल्यामुळे पत्नीची हत्या 

संदीप जगदाळे
गुरुवार, 19 जानेवारी 2017

हडपसर : पत्नीने घरातील खासगी गोष्टी फेसबुक व व्हॉटऍपवर शेअर केल्याचा राग मनात धरून पतीने पत्नीचा गळा दाबून खून केला. त्यानंतर स्वतः गळफास घेउन अत्महत्या केल्याची धक्कादायक घटना हडपसरमध्ये बुधवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमरास उघडकीस आली. 

सोनाली राकेश गांगुर्डे (वय 28) व राकेश बाळासाहेब गांगुर्डे (वय 30, दोघेही रा. शिव पार्क अपार्टमेंट, फ्लॅट नं. 104, सोलापूर रस्ता, हडपसर) अशी मृतांची नावे आहेत. या प्रकरणी मृत सोनाली यांचे भाऊ हर्षल पवार यांनी फिर्याद दिली आहे. दोघेही मूळचे नाशिकचे असून गेल्या तीन वर्षांपासून ते हडपसर येथे राहण्यास आले होते. 

गुन्हे पोलिस निरीक्षक अंजुमन बागवान यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनाली यांच्या आईने बुधवारी दिवसभर सोनाली यांना फोन करून संपर्क करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्यांनी फोन उचलला नाही. काळजीपोटी त्यांनी सोनालीचा भाऊ हर्षल पवार यास रात्री अकराच्या सुमारास सोनालीच्या घरी पाठविले. मात्र खूप वेळ आवाज दिल्यानंतर घरातून काहीही प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर घराचे लॅच उघडले. आतून कडी लावली असल्याने दार उघडले गेले नाही. शेवटी पोलिसांच्या मदतीने दार तोडून घरात प्रवेश केला. त्यावेळी बेडरूममध्ये सोनाली मृत अवस्थेत आढळली; तर राकेशने नायलॉनच्या दोरीने गळफास घेतल्याचे आढळून आले. हत्या करण्यापूर्वी राकेश याने लिहलेली चिठठी पोलिसांना मिळाली आहे. 

'घरातील खासगी गोष्टी 'फेसबुक' आणि 'व्हॉट्‌सऍप'वरून सोनाली मित्र-मैत्रिणींना शेअर करत असे. असे न करण्याबाबत तिला अनेकदा समजाविले होते; मात्र तिच्यात सुधारणा होत नव्हती. याचा राग मनात धरून हे कृत्य केले,' असे राकेशने त्या चिठ्ठीमध्ये लिहिले आहे. 

सोनाली यांनी बी. ई. पर्यंत शिक्षण घेतले आहे. काही काळ नोकरी केल्यानंतर सध्या त्या घरीच होत्या; तर राकेश याने एमबीएपर्यंत शिक्षण पूर्ण केले होते. तो लोणीकाळभोर येथील एका आयटी कंपनीमध्ये काम करत होता. त्यांना अपत्य नसल्यानेही दोघांमध्ये तणाव होता. पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरिक्षक विष्णू पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Web Title: suicide and murder at Hadapsar area in Pune