किरकोळ भांडणाच्या रागातून पत्नीने केला दोन मुलांसह आत्महत्येचा प्रयत्न

0Poison_12.jpg
0Poison_12.jpg

पुणे : पतीबरोबर झालेल्या किरकोळ भांडणाच्या रागातून पत्नीने दोन मुलांसह स्वत: विषारी किटकनाशक घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र तिघानांही वेळीच उपचार मिळाल्याने त्यांचे जीव वाचले. ही घटना नऱ्हे येथे सोमवारी सकाळी 10 वाजता घडली. 

याप्रकरणी 40 वर्षीय महिलेविरुद्ध स्वत:सह मुलांच्या जिवितास धोका निर्माण केल्याप्रकरणी सिंहगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलिस निरीक्षक एस.डी.पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, महिला व तिचा पती नरहे येथील जेएसपीएम महाविद्यालयाच्या परिसरातील अनंत भुमकर यांच्या शेतात संबंधित दाम्पत्य शेतमजुरी करतात. सोमवारी सकाळी पती-पत्नीमध्ये किरकोळ कारणावरुन भांडणे झाली. त्याचा राग आल्याने महिलेने पती कामावर गेल्यानंतर पाच वर्षाची मुलगी व चार वर्षाचा मुलास गायीच्या दुधात किटकनाशक टाकुन त्यांना पिण्यास दिले. त्यानंतर स्वत: देखील तेच दूध प्राशन केले. 

दरम्यान, हा प्रकार शेजाऱ्यांना समजला. त्यांनी तिघानांही तत्काळ खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. डॉक्टरांनीही शर्थीचे प्रयत्न करुन तिघाना वाचविले. महिला शुद्धीवर आल्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com