पत्नी, सासु-सासऱ्याच्या छळास कंटाळून पतीनेच केली आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 19 फेब्रुवारी 2019

पुणे  : पत्नी व पत्नीच्या आई-वडीलांच्या जाचास कंटाळून पतीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना 15 जानेवारीला येरवडा येथे घडली. याप्रकरणी मृताच्या भावाने उशीरा फिर्याद दाखल केली.

पुणे  : पत्नी व पत्नीच्या आई-वडीलांच्या जाचास कंटाळून पतीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना 15 जानेवारीला येरवडा येथे घडली. याप्रकरणी मृताच्या भावाने उशीरा फिर्याद दाखल केली.

श्रीकृष्ण रखमजी अवसरे (वय 35, रा. प्रिझन प्रेस कोलनी, येरवडा) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी अरुण अवसरे यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीकृष्ण अवसरे हे फिर्यादी यांचे मोठे भाऊ आहेत. श्रीकृष्ण यांचे 2012 या वर्षी लग्न झाल्यापासुन त्यांची पत्नी त्यांना घरातील सर्व कामे करण्यास भाग पाडत होती. पत्नी सांगेल त्याप्रमाणे त्यांना वागण्यास सांगत होती.

किरकोळ कारणावरुन भांडणे काढत तिच्या आई-वडीलांकडे तक्रार करत असे. त्यांच्याकडुनही आपली मुलगी सांगेल तसे वागावे म्हणून श्रीकृष्ण यांना त्रास दिला जात होता. श्रीकृष्ण यांच्याविरुद्ध पोलिसांकडे खोट्या तक्रारी करुन त्यांना कारागृहात टाकण्याची धमकी दिली जात होती. या सर्व छळाला कंटाळून श्रीकृष्णाने 15 जानेवारीला त्यांच्या राहत्या घरी पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. असे फिर्यादीने नमुद केले आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक अमोल वाघमारे करत आहे.

Web Title: Suicide committed by husband due to wife and In-law