esakal | पत्नी व तिच्या माहेरच्यांच्या छळाला कंटाळून जावयाची आत्महत्या
sakal

बोलून बातमी शोधा

crime

पत्नी व तिच्या माहेरच्यांच्या छळाला कंटाळून जावयाची आत्महत्या

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : एकत्र कुटुंबातुन वेगळे राहण्याचा अट्टाहास करणाऱ्या पत्नीसमवेत तिचे आई-वडील व भावाकडून झालेल्या मारहाणीमुळे आणि सातत्याने होणाऱ्या मानसिक छळास कंटाळून जावयाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. हि घटना मंगळवारी धनकवडी येथे घडला. याप्रकरणी सहकारनगर पोलिस ठाण्यात पत्नी, सासु-सासरा व मेव्हण्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शरद नरेंद्र भोसले (वय 30, रा.दौलतनगर सोसायटी, धनकवडी) असे आत्महत्या करणाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी नरेंद्र भोसले (वय 58) यांनी फिर्याद दाखल केली आहे. त्यावरुन पत्नी प्रियांका भोसले, सासु रोहिणी शंकर भोसले (वय 50), सासरा शंकर शिंदे (वय 56) व मेव्हणा मनीष ऊर्फ गणेश शंकर शिंदे (वय 27, सर्व. रा.कवडीपाट, लोणी काळभोर) यांच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सहाय्यक पोलिस निरीक्षक उमेश लोंढे यांनी दिलेल्या माहितीनुसार, शरद भोसले यांचे धनकवडी येथे हॉटेल होते. त्यांचा 2017 मध्ये प्रियांकाशी विवाह झाला होता. ते पत्नी, मुलगी व आई-वडीलांसह धनकवडीमध्ये राहात होते.

हेही वाचा: एमपीएससीच्या परीक्षेसाठी दीड तास अगोदर उपस्थित राहणे अनिवार्य

पत्नी प्रियांका हि तिच्या आई- वडीलांच्या सांगण्यावरुन पतीच्या कुटुंबापासून वेगळे राहण्यासाठी अट्टाहास करीत होती. त्यावरुन त्यांच्यात सातत्याने भांडणे सुरू होती. दरम्यान, पत्नीने या प्रकाराबाबत तिचा भाऊ गणेशला सांगितले. गणेशने भांडणे मिटविण्यासाठी भोसले यांना मार्केट यार्ड येथे बोलावले. त्यानंतर त्यांना तेथे शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. या घटनेनंत गणेशने पुन्हा शरद व त्यांच्या वडीलांना हडपसर येथील हांडेवाडी परिसरात बोलावून दोघांनाही शिवीगाळ करीत मारहाण केली होती. या सगळ्या मानसिक व शारिरीक त्रासाला कंटाळून शरद भोसले यांनी त्यांच्या धनकवडी येथील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पत्नी, सासु-सासरा व तिच्या भावाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

loading image
go to top