पुणे : सासरच्या छळाला कंटाळून उच्चशिक्षित विवाहीतेची आत्महत्या

पतीसह सासरच्या मंडळींविरुद्ध वानवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
woman
womansakal

पुणे: विवाहात मानपान केला नाही तसेच हुंडा कमी दिल्याच्या कारणावरुन पतीसह सासरच्या मंडळींकडून होणाऱ्या छळास कंटाळून विवाहीतेने इमारतीवरुन उडी मारून आत्महत्या केली. हि घटना सोमवारी सकाळी साडे आठ वाजण्याच्या सुमारास हडपसरमधील हांडेवारी येथे घडली. याप्रकरणी वानवडी पोलिस ठाण्यात पतीसह नातेवाईकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दिव्या तरुण कानडे (वय 24, रा. नवरत्न एक्‍झोटिका सोसायटी, हांडेवाडी, हडपसर) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. याप्रकरणी पती तरुण कानडे (वय 30), सासरे मदन कानडे, सासू सपना कानडे, दीर अरुण यांच्याविरुद्ध विवाहीतेस आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी शामराव आनंदा बनसोडे (वय 50, रा. घानेगाव,गंगापूर, औरंगाबाद) यांनी वानवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक दत्तप्रसाद शेंडगे यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी बनसोडे हे व्यावसायिक आहेत. त्यांची उच्चशिक्षित मुलगी दिव्या हिचा 1 जानेवारी 2021 रोजी तरुण कानडे याच्यासमवेत लग्न झाले होते.

तेव्हापासून ती सासरी नांदत होती. लग्न झाल्यापासूनच तिचा पती व सासरची मंडळी संगनमत करुन वारंवार तिच्याकडे पैसे व दागिन्यांची मागणी करीत होते. तिला सतत टोचून बोलत मानसिक त्रास देत होते. ""तुझा बाप श्रीमंत आहे. त्याच्याकडे भरपुर पैसा आहे. त्यांनी लग्नातसुद्धा मानपान केला नाही, हुंडा देखील कमी दिला'' असे बोलून तिचा छळ करीत होते. सासरच्या छळाला कंटाळून अखेर दिव्याने सोमवारी सकाळी साडे आठ वाजण्याच्या सुमारास ते राहात असलेल्या इमारतीवरुन उडी मारुन आत्महत्या केली. दिव्या गर्भवती असूनही तिचा छळ केला जात होता, असे बनसोडे यांच्या फिर्यादीमध्ये नमूद केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com