esakal | अर्धांगवायू असतानाही ७२ वर्षीय सुलभा देवस्थळी छंदात दंग

बोलून बातमी शोधा

Sulbha Devsthali
आजीबाईंच्या चित्रांत उमेदीचे रंग
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे - वय वर्ष ७२. वृद्धत्वाबरोबरच अर्धांगवायूचं दुखणं; पण या वेदनांना कुरवाळत न बसता आजीबाई (Old Women) चित्रांच्या दुनियेत रमताहेत. त्यांनी साकारलेली चित्रे (Drawing) सर्वांचीच उमेद वाढवताहेत. सुलभा देवस्थळी (Sulbha Devsthali) असं या आजीबाईंचं नाव. सिंहगड रस्ता येथे राहणाऱ्या सुलभा आजींना व्यवस्थित बोलता येत नाही; पण चित्रांसाठी त्यांचा हात कधी थांबत नाही. त्या मूळच्या कऱ्हाडच्या. आईकडून संगीताचे बाळकडू मिळालेल्या आजींचा आवाजही उत्तम होता. त्यांनी संगीताच्या पाच परीक्षा (Exam) दिल्या. त्यांचे सातारा आकाशवाणी केंद्रावर गाण्याचे कार्यक्रमही झाले आहेत. चित्रकला जोपासत त्यांनी हिंदी विषय घेऊन बी.ए. केले. (Sulbha Devsthali Drawing Hobby)

सुलभा आजींनी आतापर्यंत अडीच हजारांहून अधिक चित्रे काढली आहेत. फ्रीहँड या प्रकारची चित्रे काढण्याचा त्यांचा हातखंडा आहे. रोज एक चित्र काढण्याची त्यांची सवय गेल्या चार वर्षांपासून कायम आहे.

हेही वाचा: 'किराणा दुकानांची वेळ वाढवून द्या; व्यापाऱ्यांची मागणी

दोन महिने बेशुद्धावस्थेत

सुलभा आजींना १९९६ मध्ये अर्धांगवायूचा झटका आला. त्यावेळी दोन महिने त्या बेशुद्धावस्थेत होत्या. अर्धांगवायूमुळे त्यांच्या शरीराचा डावा भाग संवेदनाहीन झाला आहे. त्यामुळे त्यांना शरीराची हालचालही करता येत नाही. त्या एकाच जागेवर बसून असतात. या दुखण्यामुळे त्यांच्या स्मृतीवरही थोडा परिणाम झाला. पती भालचंद्र, मुलगा गिरीश आणि मुलगी अर्चना यांनी त्यांना आधार देत या दुखण्यातून सावरले; परंतु यासाठी त्यांना बावीस वर्षांचा कालावधी लागला.

मुलाने लावली सवय

सुलभा आजींचा मुलगा गिरीश एका खासगी कंपनीमध्ये नोकरी करीत होता. त्याचे २०१७ मध्ये हृदयविकाराने निधन झाले. आईला तिचे दुखणे थोड्या वेळाकरिता का होईना विसरण्यासाठी एक सवय गिरीशने लावली होती. ती म्हणजे तो रोज आईकडून एक चित्र काढून घ्यायचा. अर्धांगवायूच्या झटक्याने एक बाजू गमावली असतानाही गिरीश यांनी सुलभा यांना पुन्हा नव्या उमेदीनं त्यांचा छंद जोपासण्याची सवय लावली. मुलाच्या मृत्यूनंतर त्याच्या इच्छेखातर का होईना सासूबाई चित्रे काढण्यात रमतात, असे त्यांच्या सूनबाई श्रुती देवस्थळी यांनी सांगितले.

पुण्याच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा