माजरीत उन्हाळी शिबीरात उत्साहात

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 19 मे 2018

मांजरी - हांडेवाडी येथील जेएसपीएम संकुलातील सिग्नेट पब्लिक स्कूलच्या वतीने शालेय उपक्रमांतर्गत आयोजित केलेले उन्हाळी शिबीर उत्साहात पार पडले. ३ ते १४ वयोगटातील विध्यार्थ्यांसाठी हे शिबीर आयोजित करण्यात आले होते.

शिबिरामध्ये रायफल शूटिंग, घोडेस्वारी, योगा, आर्ट क्राफ्ट, कराटे तसेच इंग्रजी व गणित या विषयाशी निगडीत मनोरंजनात्मक खेळ घेण्यात आले. विद्यार्थ्याकडून त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. 

या शिबिराबाबत प्राचार्या वर्षा कोकीळ म्हणाल्या, "असे उपक्रम राबवून विद्यार्थ्यांमध्ये स्वावलंबन, स्वयंरोजगार आणि व्यावसायिक वृत्ती जोपासण्याचा प्रयत्न केला जात आहे. समाजापर्यंत हस्तकला, योग, कराटे चे महत्व पटवून देण्याचे काम केले जाते.''

यावेळी आयोजित स्पर्धेत विद्यार्थ्याबरोबर पालकांनीही सहभाग घेतला स्पर्धेत विशेष प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांना गोष्टीची पुस्तके भेट देण्यात आली. संकुल संचालक डॉ. व्ही. ए. बुगडे, सहसंचालक डॉ. संजय सावंत यांच्या हस्ते त्याचे वाटप करण्यात आले.   उपप्राचार्या कल्पना निलाखे, पर्यवेक्षिका दिपमाला खुणे यांनी संयोजन केले.

Web Title: summer camp in majri