उन्हाळा वाढल्याने सासवडला पाणी टंचाई जाणवू लागली

श्रीकृष्ण नेवसे
गुरुवार, 29 मार्च 2018

सासवड (पुणे) : येथे सासवड (ता. पुरंदर) शहराला आताच पाणी टंचाई जाणवू लागली आहे. त्यामुळे गराडे जलाशयाचे पाणी येणे बंद झाल्याने. नळाद्वारे येणाऱ्या पाण्यात रोज 15 मिनीटांची घट आली आहे. तर पाणी पुरवठ्याच्या वेळाही बिघडल्या आहेत. वेळेवर व योग्य दाबाने पाणी न आल्याने नागरीकांची त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी धावपळ सुरु झाली आहे. दिवसाआड पाणीही वेळेवर मिळत नसल्याची अोरड सुरु झाल्याचे दिसत आहे.  

गराडे (ता. पुरंदर) येथील लघू पाटबंधारे जलाशयाचे पाणी पाटबंधारे खात्याने सासवड नगरपरीषदेच्या पाणी पुरवठा विभागाला देणे बंद केले आहे. गराडे जलाशयावर परिसरातील सात गावे अवलंबून आहेत. शिवाय परिसरातील लाभार्थी गावांना रब्बी आवर्तन सोडल्याने सध्या 65 दशलक्ष घनफूट क्षमतेच्या गराडे जलाशयात 10 ते 12 टक्केच पाणी राहील्याने ते सासवडसाठी मिळणारे 18 लाख लिटर्स पाणी बंद झाल्याची माहिती मिळाली. त्याशिवाय घोरवडी जलाशयातून रोज 10 लाख लिटर्स पाणी येते, मात्र तिकडील जलवाहिन्या वारंवार फुटतात. वीर धरणाहून राबविलेल्या 18 कोटी रुपये खर्चाच्या योजनेतून 35 लाख लिटर्स पाणी येते. मात्र 180 अश्वशक्तीचा तीनपैकी एक वीजपंप बंद पडला होता. तो आता दुरुस्त झाला, तरी त्याचा परिणाम पाणी पुरवठा विस्कळीत होण्यावर झाला. सध्या गराडे जलाशय बंद असला तरी त्याखालील विहीरीचे दोन लाख लिटर्स, वीरचे 35 लाख लिटर्स व घोरवडीचे 10 लाख लिटर्स असे 47 लाख लिटर्स पाणी चोवीस तासात सासवडला येते. मात्र रोज 55 ते 60 लाख लिटर्स पाणी शहरास लागते. त्यामुळे पाण्यात घट आली आहे. 

``वीर धरणावरील सासवड नगरपरिषदेच्या पाणी योजनेची व इतर योजनांचीही पहाणी लवकरच आम्ही पदाधिकारी करु. यंदा शेवटी पाऊस झाला, तरी तुलनेत तो कमी झाला. आता उन्हाळा आल्याने.. आगामी काळात पाण्याचे नीट नियोजन करून नागरिकांना सुरळीत पाणी पुरवठा केला जाईल. नागरीकांनी पाणी वाया घालवू नये.`` असे नगराध्यक्ष मार्तंड भोंडे यांनी सांगितले. 

``नगरपरीषदेचा पाणी पुरवठा विभाग पाण्याचे व्यवस्थित नियोजन करून एक दिवसाआड पाणी पुरवठा सध्या करीत आहे. सासवडची वार्षिक यात्रा लवकरच रविवारपासून दोन - तीन दिवस आहे. ती पार पाडल्यानंतर नागरिकांची गैरसोय न होऊन देता.. पाणी पुरवठा दोन दिवसाआड करण्याचा विचार आहे.``, असे पाणी पुरवठा विभागाचे प्रमुख माऊली गिरमे यांनी सांगितले. 

Web Title: As the summer grew, Saswad got water shortage