उन्हाळी सुट्यांसाठी रेल्वेच्या जादा गाड्या

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 23 एप्रिल 2017

पुणे - उन्हाळ्याच्या सुट्यांमध्ये प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेत मध्ये रेल्वेने पुण्यावरून ३४० मार्गांवर नियमित गाड्यांव्यतिरिक्त विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये २३९ गाड्या थेट पुणे रेल्वे स्थानकावरून आणि १०१ गाड्या पुणेमार्गे जाणाऱ्या आहेत. या गाड्या पाच जुलैपर्यंत प्रवाशांच्या सेवेत असतील.

पुणे ते जबलपूर, अमरावती, निजामुद्दीन, अजनी, संतरागाची, कामाख्या, नागपूर, मडगांव, पटना, तिरुनेलवेली, एर्नाकुलम आणि बिलासपूर या गाड्यांचा समावेश आहे. यामध्ये निजामुद्दीन, संतरागाची, अजनी आणि अमरावती या वातानुकूलित गाड्या असतील. याबरोबरच पुण्यावरून जाणाऱ्या मुंबई-हैदराबाद, मुंबई-यशवंतपूर, यशवंतपूर-पंढरपूर, यशवंतपूर-जयपूर, चेन्नई-अहमदाबाद आणि अहमदाबाद-हैदराबाद या गाड्यांचा समावेश आहे. यापैकी मुंबई-हैदराबाद, मुंबई-यशवंतपूर या गाड्या वातानुकूलित 
असतील.

नोकरी किंवा शिक्षणानिमित्त राज्याच्या कानाकोपऱ्यातील किंवा परराज्यांतील नागरिक मोठ्या संख्येने पुणे शहरात स्थायिक झालेले आहेत. उन्हाळ्यात शाळा आणि कॉलेजांना सुट्या लागल्यानंतर गावी जाणाऱ्यांचे प्रमाण वाढते. तसेच, पर्यटनासाठी जाणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. त्यामुळे संपूर्ण मे महिन्यात रेल्वेच्या सर्वच गाड्यांना प्रचंड गर्दी असते. प्रवाशांना ‘कन्फर्म’ तिकीट मिळतच नाही आणि आरक्षित डब्यांना जनरल डब्याचे स्वरूप येते. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाने हे पाऊल उचलले आहे.

Web Title: summer holiday extra railway