दिवसा उन्हाचा कडाका, रात्री गारवा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 3 मार्च 2017

पुणे - महापालिकेच्या निवडणुकांनंतर ‘राजकीय तापमान’ कमी होत असले, तरीही वातावरणातील उन्हाचा चटका मात्र वाढू लागला आहे. दिवसा उन्हाचा कडाका आणि रात्री हवेत गारवा असे विषम वातावरण सध्या पुणेकर अनुभवत आहेत. त्यामुळे नीरा, उसाचा रस, लिंबू सरबत, आईस्क्रिमबरोबरच बर्फाच्या खट्टामिठ्ठाच्या हातगाड्यांवर गर्दी वाढल्याचे दृश्‍य शहरामध्ये दिसत आहे. 

शहरात मार्चच्या पहिल्या आठवड्यातच कमाल तापमानाचा पारा पस्तीशीपर्यंत वाढला आहे. किमान तापमानाच्या सरासरीपेक्षाही दोन अंश सेल्सिअस जास्त किमान तापमानाच्या पाऱ्याने उसळी मारली आहे. त्यामुळे भरदुपारी टोपी, गॉगल, स्कार्प घालून फिरणारे तरुण रस्त्यांवर दिसत आहेत. या उन्हाच्या चटक्‍यात शरीराला गार ठेवण्यासाठी, त्यातील पाण्याचे प्रमाण योग्य राखण्यासाठी शीतपेयांच्या गाड्यांवर गर्दी केल्याचे दृश्‍य दिसत आहे. 

उन्हातून आल्यावर लगेच 
फ्रिजमधील पाणी पिऊ नये
जोरदार फॅन खाली बसणे टाळावे
उन्हातून थेट वातानुकूलित खोलीत जाऊ नका
उन्हापासून संरक्षणासाठी स्कार्प, गॉगल वापरावा

उन्हाळ्याच्या सुरवातीला कांजिण्यासारख्या संसर्गजन्य रुग्णांची वाढ होते. तसेच, दूषित पाण्यामुळे होणाऱ्या उलट्या, जुलाबाचा धोका असतो. त्यामुळे परीक्षेच्या काळात पालकांनी मुलांच्या आरोग्याची 
काळजी घ्यावी. त्यांना पुरेशा प्रमाणात क्षार आणि पाणी द्यावे. 
- डॉ. प्रमोद जोग, बालरोग तज्ज्ञ

Web Title: summer increase