Summer : उन्हाचा चटका वाढला; दुग्धजन्य शितपेयांच्या मागणीत वाढ

एप्रिल महिना सुरु झाला असून शहरात उन्हाचा तडाखा मोठ्या प्रमाणात जाणवू लागला आहे.
Cold Drinks
Cold Drinkssakal

कात्रज - एप्रिल महिना सुरु झाला असून शहरात उन्हाचा तडाखा मोठ्या प्रमाणात जाणवू लागला आहे. या पार्श्वभूमीवर दुग्धजन्य शितपेयांच्या मागणीत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. दरवर्षीच्या तुलनेत यंदा जीरा ताक किंवा विदेशी शितपेयांच्या तुलनेत ग्राहक दुग्धजन्य शितपेयांना प्राधान्य देत आहेत. आईस्क्रीम, सुगंधी दूध, ताक, लस्सी, श्रीखंड खरेदीकडे ग्राहकांचा कल आहे.

मार्च, एप्रिल आणि मे महिन्यात मोठ्या प्रमाणात शितपेयांची विक्री होत असते. आईस्क्रीममध्ये पिस्ता, बटरस्कॉच, मँगो, पेरु, व्हॅनिला असे विविध प्रकार आणि लस्सीमध्ये साधी लस्सी आणि मँगो लस्सी तर ताकामध्ये मसाला, जिरा ताकासारख्या उत्पादनांना मोठ्या प्रमाणात मागणी आहे. त्यामुळे दुधालाही मोठ्या प्रमाणात मागणी वाढली असून त्याचा फायदा दूध व्यावसायिकांनाही होत असल्याचे दिसून येत आहे.

पुणे जिल्हा दूध उत्पादक संघाच्या कात्रज डेअरीकडून उत्पादित होत असलेल्या साडेसात टन आईस्क्रीम आणि सहा टन दह्याची दररोज विक्री होत आहे. तर दिवसाला ४४ हजार लिटर साधे ताक पुणेकर फस्त करत आहेत. त्याचबरोबर, मोठ्या प्रमाणांत जीरा ताक, मँगो लस्सी, सुगंधी दूध, साधी लस्सी, सॉफ्टी आईस्क्रीम, मस्तानीची विक्री होते.

कात्रजची दैनंदिन थंड पदार्थांची विक्री

  • दही- ६ टन

  • आईस्क्रीम-७.५ टन

  • साधे ताक- ४४ हजार लिटर

  • जिरा ताक - १२ हजार पिशव्या

  • लस्सी -२२ हजार पिशव्या

  • पनीर - ६५० किलो

  • श्रीखंड- ७०० किलो

  • आम्रखंड-६०० किलो

  • सुगंधी दूध-११ हजार पिशव्या

प्रतिक्रिया

दरवर्षीच्या तुलनेत यंदा साधारण शितपेयांपेक्षा दुग्धजन्य शितपेयांना जास्त मागणी आहे. ही मागणी आमच्या दृष्टीने अनपेक्षित आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून आमच्याकडे कल येत असतात, त्यातही सर्वांकडून मोठी वाढ सांगण्यात येत आहे.

- रामदास कुतवळ, व्यवस्थापकीय संचालक, कुतवळ फूड्स

कात्रज डेअरीची उत्पादने ही दर्जेदार आहेत. त्याचबरोबर यंदा मोठ्या प्रमाणात उन्हाचा तडाखा जाणवत असल्याने ग्राहकांची मागणी वाढली आहे. मार्च एप्रिल आणि मे या तीन महिन्यात आम्हाला मोठी विक्री अपेक्षित असते. तसेच कात्रजने यंदा मस्तानीसारखा नवीन आणि चांगला पर्यायही ग्राहकांना दिला आहे.

- भगवान पासलकर, अध्यक्ष, पुणे जिल्हा दूध संघ

माझा आईस्क्रीमचा व्यवसाय असून मार्च, एप्रिल आणि मे महिन्यात होणारी आईस्क्रीमची विक्री ही उर्वरित ९ महिन्यांपेक्षा जास्त असते. यंदाही आम्हाला एप्रिल आणि मे महिन्यात मोठ्या प्रमाणात विक्रीची अपेक्षा आहे.

- संचालक, श्रेयश डिस्ट्रीब्युटर्स, कात्रज

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com