उन्हाळी हंगामासाठी पुरेसे पाणी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 28 एप्रिल 2018

माळेगाव - भाटघर, वीर व नीरा देवघर धरणांत सध्या पाण्याची उपलब्धता १७.५७ टीएमसी असून, गतवर्षीच्या तुलनेत ८ टीएमसीने जास्त पाणीसाठा आहे. त्यामध्ये नीरा डाव्या कालव्यांतर्गत उन्हाळी हंगामात सिंचनासाठी ३ टीएमसी पाण्याचा वापर झाला असून, साडेपाच टीएमसी पाण्याची उपलब्धता आहे. त्यामुळे यंदा सर्व शेतकऱ्यांना पुरेसे पाणी मिळणार आहे. अफवांवर विश्‍वास न ठेवता शेतकऱ्यांनी जलसंपदा विभागास सहकार्य करावे, असे आवाहन जलसंपदा खात्याचे कार्यकारी अभियंता प्रवीण कोल्हे यांनी केले आहे. 

इंदापूर तालुक्‍यातील लासुर्णे येथील वसंत पवार यांनी पाणीटंचाईप्रकरणी आत्महत्या केल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे नीरा डाव्या कालव्यांतर्गत पाणीवाटपाबाबत जलसंपदा खात्याच्या कार्यपद्धतीवर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले होते. या पार्श्‍वभूमीवर कार्यकारी अभियंता प्रवीण कोल्हे यांनी माहिती दिली. ते म्हणाले, ‘‘सव्वाशे वर्षांपूर्वी बांधलेल्या नीरा डावा कालव्याची घटलेली वहनक्षमता, कालव्याला सायपनसारखा लागलेला ‘कॅन्सर’, वाढते सिंचन क्षेत्र आदी समस्यांमुळे भाटघर, वीर, नीरा देवघर धरणांत सध्या पुरेशा पाण्याची उपलब्धता असूनही शेतकऱ्यांना एकावेळी पाणी देता येत नाही. नीरा डाव्या कालव्याचे एकूण लाभक्षेत्र ६८ हजार हेक्‍टर असून, प्रकल्पीय तरतुदीनुसार ३७ हजार हेक्‍टर क्षेत्र सिंचित करणे अपेक्षित आहे.

त्यापैकी केवळ ५ टक्के बागायती क्षेत्र गृहीत धरले आहे. प्रत्यक्षात लाभ क्षेत्रामध्ये जवळपास १ लाख हेक्‍टरपेक्षाही अधिक जमीन सिंचनाखाली आली आहे. 

यापैकी जवळपास ५० टक्के क्षेत्र बागायती आहे. परिणामी, सिंचन प्रणालीवर मोठ्या प्रमाणात ताण येत आहे. 

कालव्याची एकूण लांबी १५३ किलोमीटर असून, वितरिका
क्रमांक ४६ पर्यंतचे क्षेत्र बारमाही आहे. त्या खालील क्षेत्र बिगर बारमाही आहे. या क्षेत्रास खडकवासला प्रकल्पातील पाणी सणसर कटद्वारे आणून बारमाही करण्याची तरतूद आहे. परंतु प्रत्यक्षात पाणी मिळत नसल्याने त्याचा ताण नीरा डाव्या कालव्यावर येतो.’’

कालवे सल्लागार समितीच्या निर्देशानुसार वितरिकानिहाय पाणी हक्कदारी निश्‍चित करून ‘टेल टू हेड’ पद्धत अवलंबली जाते. सध्या निमगाव उपविभागातील जवळपास १५ हजार हेक्‍टर क्षेत्रावर सिंचन झाले असून, या उपविभागातील सिंचन अंतिम टप्प्यावर आहे. बारामती उपविभागांतर्गत सर्व वितरिकांना पाणी सोडण्याचे नियोजन झाले आहे.
- प्रवीण कोल्हे,  कार्यकारी अभियंता, जलसंपदा विभाग 

Web Title: summer season water water storage