आला उन्हाळा... एक घोट पाणी पक्ष्यांना देऊ

गंगा व्हिलेजमधील ट्रेकिंग ग्रुप - झाडाला बांधलेले मडके पाण्याने भरणार
water for birds
water for birdssakal
Summary

गंगा व्हिलेजमधील ट्रेकिंग ग्रुप - झाडाला बांधलेले मडके पाण्याने भरणार

उंड्री - उन्हाची तीव्रता वाढू लागली आहे. डोंगर उघडेबोडके दिसू लागले आहेत. पक्ष्यांची पाण्यासाठी घालमेल होताना पाहून हांडेवाडी रस्ता येथील गंगा व्हिलेजच्या ट्रेकिंग ग्रुपने एक घोट पक्ष्यांसाठी हा उपक्रम हाती घेतला आहे. कानिफनाथ गडावरील झाडांना पसरट तोंडाचे मटके बांधून आठवड्यातून दोन वेळे ते पाण्याने भरले जाणार आहे, असे डॉ. अनिल पाटील आणि वर्षा पाटील यांनी सांगितले. याप्रसंगी सोसायटीचे चेअरमन राजू गायकवाड आणि संचालक उपस्थित होते.

डॉ. पाटील म्हणाले की, दर रविवारी कानिफनाथ गडावर जात असून, आतापर्यंत एक हजार वृक्षांची लागवड करून संवर्धन केले आहे. उन्हाची तीव्रता वाढू लागल्यामुळे मुक्या प्राण्यांसाठी एक घोट पाण्याचा उपक्रम कानिफनाथ गडावर सुरू केला आहे. झाडांच्या फांद्यांवर पाण्याने भरलेले पसरट तोंडाचे मडके बांधले असून, आठवड्यातून दोन वेळे ते पाण्याने भरणार आहोत.

तसेच, सोसायटीचे छत आणि गॅलरीमध्येही भांड्यांमध्ये पाणी भरून ठेवण्याचा उपक्रम हाती घेतला. याविषयी इतरही सोसायट्यांमधील नागरिकांमध्ये प्रबोधन केले जात आहे. ट्रेककिंग करीत असताना अध्यात्म, प्राणीमात्रेविषयी प्रेम आणि निसर्गाचं संवर्धन या विषयावर संवाद करीत प्रबोधन केले जात आहे. कोरोनामध्ये प्रत्येकाला प्राणवायूचे महत्त्व कळले आहे. त्यामुळे भविष्यात अशी वेळ येऊ नये यासाठी निसर्गाचे संवर्धन करण्यासाठी झाडी लावणे आणि जोपासणे हा उपक्रम हाती घेतला आहे, असे स्पष्ट केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com