
माळेगाव - ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, बारामतीच्या पुढाकारातून सध्या लाॅगडाॅऊनच्या काळातही ग्रामीण भागातील शेकडो महिलांच्या हताला काम मिळाले आहे. संस्थेच्या विश्वस्त सौ. सुनंदा पवार, कुंती पवार यांच्या मध्यस्थीने संबंधित महिलांना ८५ हजार मास्क तयार करण्याची ऑर्डर मिळाली आहे. परिणामी पवार यांच्या सहकायामुळे आमचे प्रपंच सावरण्यास मदत होत आहे, अशी आशावादी भावना अनेक महिलांनी बोलून दाखविली.
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
बारामती ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या माध्यमातून अनेक वर्षांपासून शेती, शिक्षण आणि विशेषतः ग्रामीण भागातील महिलांना सक्षम करण्याचा प्रयत्न झाला आहे. त्याचाच एक भाग म्हणून संस्था पातळीवर सध्या लाॅगडाॅऊनच्या कालावधीत महिलांना मास्क तयार करण्याचा व्यावसाय मिळवून देण्यास मदत झाली आहे. अर्थात या कामी महाराष्ट्र क्रेडाईचे अध्यक्ष व मगरपट्टा सिटीचे सर्वेसर्वा सतीश मगर यांचे विशेष सहकार्य होत आहे, अशी माहिती सुनंदा पवार यांनी स्पष्ट केली. पवार म्हणाल्या, ``गेली १५ वर्षांपूर्वी शारदा महिला संघामार्फत ग्रामीण भागात महिला बचत गटांची चळवळ सुरू करण्यात आली. हजारो महिला या चळवळीत एकत्र आल्या. प्रशिक्षण घेऊन आत्मविश्वासाने उत्पादने बनवू आणि विकू लागल्या आहेत.
मात्र ग्रामीण भागात माल विक्रीच्या अडचणी लक्षात घेत भीमथडी जत्रा, गाव तिथे महिला उद्योग, ऑनलाइन भिमथडी असे आर्थिक आणि महिला सबलीकरणाचे उपक्रम संस्थेच्या वतीने सुरू करण्यात आले आणि ते यशस्वीही झाल्याची नोंद आहे. परंतु गेली ४ महिन्यांच्या काळात कोरोनामुळे अनेकांचा रोजगार गेला. व्यवसाय कमी झाला. याही अडचणीच्या काळात संस्था महिलांच्या हाताला काम देण्यासाठी व त्यांच्या कामाला योग्य ते दाम मिळवून देण्यासाठी प्रयत्न करीत आहे.` दरम्यान, मगरपट्टा सिटी ग्रुपच्या वतीने पुरंदर, बारामती, इंदापूर, कर्जत व जामखेड या तालुक्यातील सुमारे तिनशे महिलांना ८५ हजार मास्क बनविण्याची ऑर्डर सध्या मिळाली आहे. मागील आठवड्यात प्रत्यक्षात मास्क उत्पादनाला सुरुवात करण्यात आली आहे. यामध्ये कापड कटींग, शिलाई, प्रिंटिंग व पॅकिंग अशा विविध जबाबदाऱ्या महिला बचत गटांना देण्यात आल्या आहेत. तसेच निवडक महिला बचत गटांना मास्क शिवण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. मालाची गुणवत्ता, मूल्यमापन, कच्चा माल वेळेवर पोहचविणे अशी सर्व काम संस्थेच्या शारदा महिला संघाचे अधिकारी करत असल्याचे सांगण्यात आले.
संकटकाळी लोकप्रतिनिधी म्हणून पवार कुटुंबिय नेहमीच जनतेच्या मदतीला धावून येते. त्याचा प्रय़त्य सध्याच्या लाॅकडाऊनच्या कालावधीत दिसून येतो. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखन्यासाठी अथवा या लाॅकडाऊनच्या कालावधीत सामान्याच्या रोजगाराचा प्रश्न सोडविण्यासाठीचे प्रयत्न पवार करीत आहेत. याचे आम्हाला मानापासून सामाधान वाटते, अशी प्रतिक्रिया अर्चना सातव (बारामती) यांनी दिली.
Edited By - Prashant Patil
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.