रविवारी सुटीच्या दिवशी ओपीडी नागरिकांसाठी महत्त्वाची ठरेल | Pune | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रविवारी सुटीच्या दिवशी ओपीडी नागरिकांसाठी महत्त्वाची ठरेल

रविवारी सुटीच्या दिवशी ओपीडी नागरिकांसाठी महत्त्वाची ठरेल

उंड्री : नोकरदार वर्गासाठी रविवारी (सुटी)च्या दिवशी ओपीडी सुरू केल्यामुळे चांगली सोय झाली नाही. काळानुरूप हा बदल करण्याची गरज होती, नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात मागणी असल्याने हा निर्णय घेतल्याचे मत चेअरमन नितीनभाई देसाई यांची कन्या व उद्योजिका शीतल नवानी यांनी व्यक्त केले.

पीबीएमएच्या एच व्ही देसाई नेत्र रूग्णालयामध्ये बालदिन आणि जागतिक मधुमेह दिनानिमित्त रविवारी सुरू राहणाऱ्या ओपीडीचे उद्घाटन शीतल नवानी यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी पीबीएमएचे चेअरमन नितीनभाई देसाई, अध्यक्ष राजेश शहा, विश्वस्त रोहित जिराजानी, मुख्य वैद्यकीय संचालक कर्नल डॉ. मदन देशपांडे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जी. व्ही. राव, वैद्यकीय संचालक डॉ. राहुल देशपांडे, डॉ. सुचेता कुलकर्णी व रुग्णालयातील डॉक्टर व कर्मचारी उपस्थित होते.

हेही वाचा: शिर्डी : सुकलेल्या फुलाने राहीबाईंचा सत्कार

कर्नल डॉ. मदन देशपांडे म्हणाले की, पीबीएमएचे एच. व्ही. देसाई नेत्र रुग्णालयामध्ये आतापर्यंत 60 लाखांहून अधिक रुग्णांची तपासणी करून 6 लाखांहून अधिक रुग्णांची शस्त्रक्रिया केल्या आहेत. तसेच, ४ लाखांहून अधिक रुग्णांची शस्त्रक्रिया मोफत केली आहे. रुग्णालयातील सेवा वाढविण्यासाठी रुग्णालयामध्ये रविवारीसुद्धा ओपीडी सुरू करण्यात आली आहे. रविवार ओपीडीची वेळ सकाळी १० ते दुपारी २ अशी ठेवली आहे, असे त्यांनी सांगितले. डॉ. राहुल देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. सुचेता कुलकर्णी यांनी आभार मानले.

loading image
go to top