

Mumbai Pune Railway Mega Block
ESakal
पुणे - मुंबईत रविवारी (ता. २१) रेल्वे प्रशासनाने विविध कारणांसाठी ब्लॉक घेतला आहे. त्याचा परिणाम पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकावर होणार आहे. १३ मेल एक्स्प्रेस गाड्यांना कल्याण व ठाणे स्थानकादरम्यान उशीर होणार आहे. परिणामी, या गाड्यांना मुंबई गाठण्यासाठी किमान १५ मिनिटांचा उशीर होईल, असे प्रशासनाने जाहीर केले.