सुनील बर्वे पुन्हा रंगभूमीवर (व्हिडिओ)

‘तिसरे बादशहा हम’ नाटकातील एक प्रसंग.
‘तिसरे बादशहा हम’ नाटकातील एक प्रसंग.

‘तिसरे बादशहा हम’ नाटकात अभिज्ञा, मयूरीला संधी
पुणे - अभिनेता असो की अभिनेत्री चित्रपट, मालिकांमध्ये रमले तरी त्यांचे रंगभूमीवरचे प्रेम तसूभरही कमी होत नाही. कलाकारांनाही तिच्या सहवासाची ओढ लागते... अमोल पालेकर यांनी २५ वर्षांनंतर रंगभूमीवर पाऊल टाकले. त्यापाठोपाठ मराठी मालिकांतील अभिनेता सुनील बर्वे एका नाटकाद्वारे आठ वर्षांनी रंगभूमीवर येत आहे.

सुबक निर्मित ‘तिसरे बादशहा हम’ या कलाकृतीद्वारे सुनील पुन्हा रंगभूमीवर पाऊल ठेवत आहे. त्याच्याबरोबर अभिज्ञा भावे आणि मयूरी देशमुख या अभिनेत्री आहेत. समर दीक्षित, ऊर्मी आणि चारू या तीनच पात्रांद्वारे हे तीन कलाकार त्यांच्या अभिनयातून नाटकाच्या कथानकाचा कॅनव्हास रंगविणार आहेत. नाटकाचे दिग्दर्शन परितोष प्रधान यांनी केले आहे. सामाजिक विषयांवर भाष्य करणारे हे नाटक आहे. त्याचे मर्म सुनील, अभिज्ञा आणि मयूरी यांनीच उलगडले.

सुनील म्हणाला, ‘‘अभिनय माझी मूळ आवड. मध्यंतरी बराचकाळ मालिका आणि निर्मितीमध्ये अडकलो होतो. रंगभूमीवरील प्रेम काही कमी झाले नव्हते. मग एक चांगले स्क्रिप्ट मिळाले, पात्रं तीनच होती. म्हणून मी हे नाटक करायचे ठरविले आणि रंगभूमीवर पुन्हा आलो. नाटक म्हणाल तर त्यात सामाजिक पैलू मोठा आहे; पण भूमिका ही हसती-खेळती, गाणे म्हणणारी आहे.’’

अभिज्ञा म्हणाली, ‘‘लग्नलॉजी हे नाटक केले होते; परंतु त्याला बराचकाळ झाला, त्यामुळे मला पुन्हा नाटक करण्याची इच्छा होती. मला प्रेक्षकांचा लाइव्ह प्रतिसाद खूप आवडतो, त्यामुळे पुन्हा नाटकाकडे ओढली गेले. मलाही सर्वंकष म्हणजे मनोरंजनासह काही मूल्यं दाखविणारी नाटके आवडतात. हे नाटक त्या पठडीतले आहे.’’

मयूरी म्हणाली, ‘‘मला थोडा गॅप घ्यायचा होता; पण सुनील आणि अभिज्ञा यांची नावे ऐकल्यानंतर मी लगेच हे नाटक स्वीकारले. अभिनेत्री म्हणून मोठे व्हायचे असेल, तर अनुभवी कलाकारांबरोबर काम करायला हवे, तोच विचार मी केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com