

Justice Delivered: Pune Rural LCB Honored for Cracking Minde Murder Case in 5 Days
Sakal
नारायणगाव : थोरांदळे पाईनमळा (ता. आंबेगाव ) येथील ज्येष्ठ नागरिक दामोदर जयराम मिंडे( वय ६२ ) यांचा खून करून घरातील सोन्याचे दागिने, रोख रक्कम आदी ऐवज 31 मार्च 2026 रोजी चोरीला गेला होता. या गंभीर घटनेचा तपास घटनेनंतर पाच दिवसात लावून फरारा आरोपींना अटक करण्यात यश मिळवल्याबद्दल स्थानिक गुन्हे शाखा पथकातील अकरा अधिकारी व कर्मचारी यांचा प्रशंसाप्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला.