Vidhan sabha 2019 : पुण्यात भाजपने पाडले शिवसेनेलाच खिंडार

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 15 ऑक्टोबर 2019

वडील शिवसेनेत मुलगा भाजपमध्ये
माजी आमदार, शिवसेननेचे माजी शहर प्रमुख विनायक निम्हण आणि सनी निम्हण हे दोघेही भाजप प्रवेश करणार अशी चर्चा रंगली होती. पण केवळ सनी यांनीच आज प्रवेश केला. विनायक निम्हण म्हणाले, मी शिवसेनेमध्येच असून, भाजपमध्ये प्रवेश करणार नाही. सनी यांना त्यांचा निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार आहे. पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा. तर सनी यांनीही मला भाजपमध्ये चांगले काम करण्याची संधी आहे. आमच्या घरातही महायुती आहे असे सांगितले

Vidhan sabha 2019 : पुणे : शहरातील कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे पदाधिकारी, माजी आमदारांची भाजपमध्ये मेगाभरती सुरू असताना आज शिवसेनेलाही भाजपने खिंडार पाडले. माजी नगरसेवक, शिवसेनेचे शहर उपप्रमुख सनी निम्हण यांनी शिवसैनिकांसह मुंबईत राष्ट्रीय कार्याध्यक्ष जे. पी. नड्डा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत प्रवेश केला.

सनी निम्हण हे 2012 ते 2017 या कालावधीत पुणे महापालिकेत कॉंग्रेसचे नगरसेवक होते. युवक कॉंग्रेसचे शहराध्यक्ष म्हणूनही त्यांची निवड करण्यात आली होती. मात्र 2017 च्या महापालिका निवडणूकीत त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते. निम्हण यांचा औंध, बालेवाडी, बाणेर, पाषाण या भागात जनसंपर्क आहे. त्याचा फायदा विधानसभा निवडणुकीत व्हावा यासाठी भाजपने सनी निम्हण यांचा वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत प्रवेश करून घेतला. यासह माजी नगरसेवक विनोद ओरसे, शिक्षण मंडळाचे माजी सदस्य, शिवसेना विभागप्रमुख अमित मुरकुटे, राहुल शिरोळे, शिवाजीनगर युवासेनाप्रमुख अनिकेत कपोते यांच्यासह इतरांनी आज भाजपप्रवेश केला.

वडील शिवसेनेत मुलगा भाजपमध्ये
माजी आमदार, शिवसेननेचे माजी शहर प्रमुख विनायक निम्हण आणि सनी निम्हण हे दोघेही भाजप प्रवेश करणार अशी चर्चा रंगली होती. पण केवळ सनी यांनीच आज प्रवेश केला. विनायक निम्हण म्हणाले, मी शिवसेनेमध्येच असून, भाजपमध्ये प्रवेश करणार नाही. सनी यांना त्यांचा निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार आहे. पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा. तर सनी यांनीही मला भाजपमध्ये चांगले काम करण्याची संधी आहे. आमच्या घरातही महायुती आहे असे सांगितले

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sunny Nimhan's entry into BJP in the presence of CM in Maharashtra Vidhan sabha 2019