सुप्यात मात्तबरांना पराभवाचा झटका

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 30 मे 2018

सुपे - सुपे (ता. बारामती) येथे मात्तबरांचा पराभव करून स्वाती अनिल हिरवे सरपंचपदी विजयी झाल्या. या निवडणुकीत मतदारांनी प्रस्थापितांना जबर धक्का दिला आहे. एक अपवाद वगळता सर्वच उमेदवार नवीन आहेत. 

सुपे - सुपे (ता. बारामती) येथे मात्तबरांचा पराभव करून स्वाती अनिल हिरवे सरपंचपदी विजयी झाल्या. या निवडणुकीत मतदारांनी प्रस्थापितांना जबर धक्का दिला आहे. एक अपवाद वगळता सर्वच उमेदवार नवीन आहेत. 

विद्यमान उपसरपंच व दोन सदस्य पराभूत झाले आहेत. ज्येष्ठ कार्यकर्ते बी. के. हिरवे यांच्या मार्गदर्शनाखालील शिव सिद्धेश्वर ग्रामविकास पॅनेलला सर्वाधिक जागा मिळाल्या. तर बाजार समितीचे संचालक शौकत कोतवाल यांच्या शिवशंभो ग्रामविकास पॅनेलला अत्यल्प जागांवर समाधान मानावे लागले. या निवडणुकीत कोतवाल अवघ्या २० मतांनी विजयी झाले. विलास वाघचौरे हे त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार होते. त्यांच्या जनकल्याण विकास आघाडीला एक जागा मिळाली. विद्यमान उपसरपंच शफीक बागवान, सदस्या मीरा तेली, सुनीता चव्हाण पराभूत झाले. या निवडणुकीत सर्वांत कमी वयाची पल्लवी लोणकर व सर्वात अधिक वयाचे मल्हारी खैरे यशवंतराय पॅनेलमधून विजयी झाले. पल्लवी सध्या डिजिटल आर्किटेक्‍ट्‌चरच्या शेवटच्या वर्षात शिकत आहे. रेखा चांदगुडे व राजश्री धुमाळ या नणंद-भावजय विजयी झाल्या.   

सरपंचपदासाठी बी. के. हिरवे यांच्या स्नुषा कावेरी हिरवे, शौकत कोतवाल यांच्या भावजय अंजुम कोतवाल व अनिल हिरवे यांच्या पत्नी स्वाती हिरवे अशी तिरंगी अत्यंत चुरशीची, लक्षवेधी लढत झाली. 

सुरवातीपासूनच बदल घडविण्याच्या सुप्त लाटेची गावात चर्चा होती. या लाटेत स्वाती हिरवे सुमारे ३१० मतांच्या आघाडीने विजयी झाल्या. त्यांना १३९३ मते पडली. काही विजयी उमेदवारांनी फटाक्‍यांच्या आतषबाजीसह गुलाल उधळून सुप्याच्या मुख्य बाजार पेठेतून मिरवणूक काढण्यात आली.   
विजयी उमेदवार असे : स्वाती हिरवे सरपंच, अशोक सकट, मीनाक्षी बारवकर, सुधीर बारवकर, सुमन जगताप, गणेश जाधव बिनविरोध, शौकत कोतवाल, ज्योती जाधव, रेखा चांदगुडे, मुनीर डफेदार, राजश्री धुमाळ, भाग्यश्री बसाळे, पल्लवी लोणकर, मल्हारी खैरे. 

Web Title: Supe grampanchayat election