esakal | 'सुपर थर्टी'चे संस्थापक आनंद कुमार रविवारी 'सकाळ यिन'च्या फेसबुक पेजवर 
sakal

बोलून बातमी शोधा

anand kumar

"super 30' चे संस्थापक आनंद कुमार पहिल्यांदाच "सकाळ यिन'च्या व्यासपीठाद्वारे तरुणांशी संवाद साधणार आहेत.

'सुपर थर्टी'चे संस्थापक आनंद कुमार रविवारी 'सकाळ यिन'च्या फेसबुक पेजवर 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : "super 30' चे संस्थापक आनंद कुमार पहिल्यांदाच "सकाळ यिन'च्या व्यासपीठाद्वारे तरुणांशी संवाद साधणार आहेत. "पीसीईटी' नूतन संस्था यांच्यावतीने त्याचे आयोजन करण्यात आले आहे. सीईटी, आयआयटी व जेईई या परीक्षांची लॉकडाउनच्या काळात कशी तयारी करावी, यासाठी हा उपक्रम राबवला जात आहे. त्याचबरोबर त्यांची यशोगाथा व कशी झाली super30 ची निर्मिती, याबद्दल ते बोलणार आहेत. तरुणांनी या संधीचा फायदा घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. 

कधी ः 28 जून 
वेळ : दुपारी 12 वाजता 
कोठे : https://www.facebook.com/YINforChange/ 

रजिस्ट्रेशन लिंक ः http://www.tinyurl.com/Anandkumar-PCET-NUTAN-YIN 

गेल्या अनेक वर्षांपासून बिहारमधील पटना इथं सुपर 30 ही शैक्षणिक संस्था आनंद कुमार चालवत आहेत. या संस्थेच्या माध्यमातून आनंद कुमार मागास वर्गातील विद्यार्थ्यांना शिकण्याची आणि राहण्याची सुविधा देतात. त्यांच्यासोबत कुटुंबियसुद्धा या कामात मदत करतात. त्यांची आई क्लासमधील मुलांसाठी जेवण तयार करते. फक्त भारतातच नाही तर जगभरात त्यांनी नाव कमावले आहे. आनंद कुमार यांनी अमेरिकेनं द एज्युकेशन एक्सलन्स अवॉर्ड 2019 ने सन्मानित केलं आहे. त्यांच्या आयुष्यावर आधारीत सुपर थर्टी नावाचा चित्रपटही आला आहे.