औद्योगिक पट्ट्यातील गुन्हेगारी मोडीत काढणार; पोलिस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख यांची ग्वाही

जनार्दन दांडगे
Monday, 21 September 2020

चाकण, शिक्रापूर, रांजणगावसह जिल्ह्यातील सर्वच औद्योगिक पट्ट्यातील संघटित गुन्हेगारी मोडीत काढून उद्योगधंद्यासाठी सुरक्षित वातावरण निर्माण करणे, महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी विशेष उपाययोजना करणे, जिल्ह्यातील वहातूक समस्या सोडवणे आणि पोलिस ठाण्यात येणाऱ्या प्रत्येकाचे समाधान होईल, असा पारदर्शी कारभार ठेवणे, या गोष्टीवर भर दिला जाईल, असे जिल्हा (ग्रामीण) पोलिस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी सांगितले. 

लोणी काळभोर (पुणे) : चाकण, शिक्रापूर, रांजणगावसह जिल्ह्यातील सर्वच औद्योगिक पट्ट्यातील संघटित गुन्हेगारी मोडीत काढून उद्योगधंद्यासाठी सुरक्षित वातावरण निर्माण करणे, महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी विशेष उपाययोजना करणे, जिल्ह्यातील वहातूक समस्या सोडवणे आणि पोलिस ठाण्यात येणाऱ्या प्रत्येकाचे समाधान होईल, असा पारदर्शी कारभार ठेवणे, या गोष्टीवर भर दिला जाईल, असे जिल्हा (ग्रामीण) पोलिस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी सांगितले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

डॉ. देशमुख यांनी शनिवारी पदभार स्वीकारला. सोमवारी त्यांनी पोलिस मुख्यालयात पत्रकार परिषद बोलावली होती. यावेळी डॉ. देशमुख यांच्यासमवेत लोणावळ्याचे पोलिस उपविभागीय अधिकारी नवनीत कावत, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे प्रमुख, पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट उपस्थित होते. डॉ. देशमुख म्हणाले, ""औद्योगिक पट्ट्यात अेक छोटे- मोठे उद्योग चालू असून, लाखो लोकांना रोजगार उपलब्ध झालेला आहे. मात्र स्क्रॅप, माथाडी, वाहतुकीचा ठेका अशा कारणांवरून उद्योजकांना धमकावणे, खंडणी वसूल करणे, ठेकेदारी मिळविण्यासाठी दहशत निर्माण करणे या बाबी सर्रास होत आहेत. यापुढील काळात उद्योगांना सुरक्षित वातावरण निर्माण होण्यासाठी संघटीत गुन्हेगारीचे संपूर्ण उच्चाटन करण्यावर भर देणार आहे. प्रसंगी मोका, तडीपारी अशा आयुधांचा वापर केला जाईल.'' 

आरोग्य सुविधांचे ‘ऑपरेशन’ गरजेचे! 

महिलांच्या सुरक्षिततेला प्राधान्य 
""अधीक्षक म्हणून सातारा, गडचिरोली, कोल्हापूर जिल्हात काम केले. तिन्ही जिल्ह्यांत महिलांच्या सुरक्षिततेसाठी प्रभावीपणे उपाययोजना राबविल्या. पुणे जिल्ह्यातही महिलांवरील अत्याचार रोखण्याला प्राधान्य देणार आहे. सातारा, नगर, मुंबई, नाशिक व सोलापूर असे प्रमुख पाच मार्ग जिल्ह्यातून जातात. या रस्त्यांवरील वाहतूक समस्या सोडविण्यासाठी लोकप्रतिनिधी, नागरिक व पोलिस यांचा मेळ घालून उपाययोजना करण्यात येतील,'' असेही त्यांनी सांगितले. 

हतबल प्रशासनापुढे ‘जम्बो’ समस्या!

सावकारी, वाळू उपसा संपवणार 
जिल्ह्यात बेकायदा वाळू उपसा व वाहतूक बंद करण्यासाठी सक्तीची कारवाई करण्यात येणार आहे. बेकायदा सावकारी व बेकायदा गुटखा विक्री मुळापासून उखडून टाकणार आहे. येत्या महिनाभरात पोलिस अधिकारी, पत्रकार, नागरिकांसह विविध माध्यमातून याबाबत माहिती घेतली जाणार आहे. या गोष्टी करणारे व त्यांच्या पाठीशी असणाऱ्यांना कडक कारवाई केली जाईल, अशा इशाराही डॉ. देशमुख यांनी दिला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Superintendent of Police Dr. Abhinav Deshmukh said that crime in the industrial belt will be curbed