Pune | शेतकऱ्यांना वेठीस धरणे बंद करून शेतीपंपांचा वीज पुरवठा पूर्ववत करावा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Harshwardhan Patil

शेतकऱ्यांना वेठीस धरणे बंद करून शेतीपंपांचा वीज पुरवठा पूर्ववत करावा

इंदापूर - कोरोना महामारीमुळे ठप्प झालेले अर्थकारण तसेच मध्यंतरी झालेल्या अतिवृष्टीमुळेशेतकरी आर्थिकदृष्ट्या अडचणीत आहेत. शेतकऱ्यांना सहकार्य करणे व आधार देणे हे शासनाने आद्य कर्तव्य आहे. वीज बिल माफ करावे अशी मागणी करणारेच सध्या सत्तेवर आहेत .मात्र शासन शेतीपंपांचा वीज पुरवठाखंडित करून शेतकऱ्यांना त्रास देत आहे. त्यामुळे शासनाने शेतकऱ्यांना वेठीस धरणे बंद करून तात्काळ शेतीपंपांचा वीज पुरवठा पूर्ववत करावा अशी मागणी भाजप नेते व माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केली.

श्री. पाटील पुढे म्हणाले, महावितरणने शेतीपंपांचा वीज पुरवठा वीज थकबाकी वसूलीसाठी खंडित केल्याने शेतकरीअडचणीत आला असून शेतातील उभीपिकेपाण्याअभावी करपून जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. रब्बी पिकांची पेरणी तसेच ऊस पिकाच्या लागवडी चालू असून त्यास देखील याचा फटका बसत आहे.सध्या महावितरणकडून जनावरे, माणसांना पिण्याच्या पाण्यासाठी वीजपुरवठा तासभर देखील चालू ठेवलाजात नसल्याने जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यामुळे पशुधनही अडचणीत आले आहे.

हेही वाचा: ‘एटीएमएस’च्या बहान्याने काँग्रेसचा राष्ट्रवादीवर निशाणा

यासंदर्भात शेतकऱ्यांच्या तक्रारी वरून श्री. पाटील यांनी एमएसईबीच्या अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून चर्चा केली. सध्या अडचणीच्या परिस्थितीत शेतकऱ्यांना दिलासा देणेआवश्यक असल्याने वीज तोडणी मोहीम तात्काळ थांबवावी व खंडित केलेला वीज पुरवठा पूर्ववत सुरु करावा अशी आग्रही मागणी त्यांनी केली.महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांच्या अडचणीच्या परिस्थितीचा विचार करून वीज तोडणी मोहीम तत्काळ न थांबवल्यास जनआंदोलन छेडण्याचा इशारा हर्षवर्धन पाटील यांनी शेवटी दिला.

loading image
go to top