esakal | दांपत्य अधिकारानुसार 'यांना' मिळणार नुकसानभरपाई; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय
sakal

बोलून बातमी शोधा

Supreme-court

अर्जदार किती आहेत यावर ही रक्कम अवलंबून असेल. त्या शिवाय दाव्यात इतर शिर्षकांप्रमाणे नुकसान भरपाई मिळण्याचा अधिकार आहेच.

दांपत्य अधिकारानुसार 'यांना' मिळणार नुकसानभरपाई; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : पतीचा अपघातात मृत्यू झाल्यानंतर पत्नीला दांपत्य अधिकारानुसार (लॉस ऑफ कन्सॉटिअम) दिली जाणारी रक्कम आता मयत व्यक्तीची मुले आणि आई-वडिलांनीही मिळणार आहे. ही रक्कम प्रत्येकी 40 हजार रुपये असणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने नुकत्याच दिलेल्या एका निकालात ही तरतूद स्पष्ट करण्यात आली आहे.

कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांनो, अशाप्रकारे घ्या काळजी​

मोटार अपघात न्यायाधिकरणाकडे नुकसान भरपाईचा दावा दाखल केल्यानंतर ही रक्कम दिली जाते. विविध विमा कंपन्या आणि काही अर्जदारांनी दाखल केलेल्या दाव्यावर हा महत्त्वपूर्ण निकाल देण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयाने 2017 दिलेल्या प्रणय सेठी प्रकरणानुसार, अर्जदार पत्नीला किमान 40 हजार रुपये देण्यात येत होते. मात्र, त्यात पत्नी व्यतिरिक्त कोणालाही लाभ मिळत नव्हता. नवीन निकालानुसार आता पत्नीला दिली जाणारी रक्कम मुले (पॅरेन्टल कन्सॉटिअम) आणि पालकांना (फिलीअल कन्सॉटिअम) देता येईल, असे न्यायालयाने नमूद केले आहे. त्यामुळे दांपत्य अधिकारानुसार देण्यात येणारी रक्कम मुले आणि मयत व्यक्तीच्या पालकांना मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

बारामती परिसरातील सोमेश्वर विद्यालयाच्या इमारतीत होणार कोविड केअर सेंटर​

मोटार अपघात न्यायाधिकरणासमोर दावा चालविणारे ऍड. अनिरुद्ध पायगुडे यांनी या निकालाबाबत सांगितले, या निकालामुळे आता 'लॉस ऑफ कन्सॉटिअम' या शीर्षकाखाली मिळणारी रक्कम मृताच्या पत्नीसह त्याचे मुले व पालकांना मिळू शकणार आहे. विशेष म्हणजे प्रत्येक अर्जदाराला स्वतंत्र ही रक्कम मिळणार आहे. मयत व्यक्तीस पत्नी, दोन मुले आणि आई-वडील असतील, तर त्यांना प्रत्येकी 40 हजार रुपये असे दोन लाख रुपये मिळू शकतात. अर्जदार किती आहेत यावर ही रक्कम अवलंबून असेल. त्या शिवाय दाव्यात इतर शिर्षकांप्रमाणे नुकसान भरपाई मिळण्याचा अधिकार आहेच.

पुणे महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थी होणार 'स्मार्ट'

नुकसान भरपाई वाढली :
कुटुंबातील प्रमुख आणि कमावत्या व्यक्तीचे निधन झाल्यानंतर त्यावर अवलंबून असलेल्या व्यक्तीची आर्थिक हेळसांड होत असल्याचे अनेक प्रकरणांत पाहायला मिळते. या बाबीचा विचार करून न्यायालयाने ती तरतूद केली असावी. त्यामुळे नुकसान भरपाईत हक्‍काच्या रकमेत वाढ झाली आहे.

नवीन तरतुदीची हे फायदे :
- प्रत्येक अर्जदाराला 40 हजार मिळणार
- नुकसान भरपाईच्या रकमेत होणार वाढ
- पूर्वी केवळ पत्नीला मिळायचा लाभ
- आता आई-वडिलांना देखील मिळणार आर्थिक आधार

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

loading image