सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला जामीन; बऱ्हाटेच्या अटकेचा कायदेशीर मार्ग मोकळा

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 23 September 2020

बऱ्हाटे याचा एफआयआरमध्ये प्रत्यक्ष सहभाग नसल्याचे सांगत बचाव पक्षाने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. त्यास पोलिसांनी सरकारी वकिलांच्या माध्यमातून विरोध केला होता.

पुणे : बांधकाम व्यावसायिकाला बलात्काराच्या खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देत दोन कोटी रुपयांची खंडणी आणि जागा नावावर करून देण्याची मागणी केल्याप्रकरणात माहिती अधिकार कार्यकर्ता रवींद्र लक्ष्मण बऱ्हाटे याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयाने देखील बुधवारी (ता.23) फेटाळला. यापूर्वी सत्र आणि उच्च न्यायालयानेही त्याचा अर्ज नामंजूर केला आहे.

शंभर कोटींवर पाणी! स्पर्धा परीक्षांचे अर्थकारणच ठप्प​

न्यायाधीश अशोक भूषण, न्यायाधीश सुभाष रेड्डी आणि न्यायाधीश एम. आर. शहा यांच्या खंडपीठाने हा आदेश दिला. बऱ्हाटे याने या गुन्ह्याचा कट रचल्याचे पोलिस तपासातून पुढे आले आहे. या प्रकरणात बडतर्फ पोलिस कर्मचारी शैलेश हरिभाऊ जगताप (वय 49, रा.भवानी पेठ), पत्रकार देवेंद्र फुलचंद जैन (वय 52, रा. प्रियदर्शन सोसा.सिंहगड रोड), दीप्ती आहेर (वय 34, रा. बावधन) आणि अमोल सतीश चव्हाण (चव्हाणवाडा, कोथरूड) यांना अटक करण्यात आली आहे.

सांगा आम्ही जगायचं कसं ? ; सिंहगडावरील कुटुंबांचा प्रशासनाला सवाल

बऱ्हाटे याचा एफआयआरमध्ये प्रत्यक्ष सहभाग नसल्याचे सांगत बचाव पक्षाने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. त्यास पोलिसांनी सरकारी वकिलांच्या माध्यमातून विरोध केला होता. बऱ्हाटे आणि त्याच्या साथीदारांवर सुरवातीला कोथरूड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. त्यानंतर बऱ्हाटेसह इतरांवर शहरातील विविध पोलिस ठाण्यांत खंडणी आणि फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांपासून बचाव करीत फिरणाऱ्या बऱ्हाटे याने ओळखीच्या व्यक्तीची दुचाकी चोरल्याचाही गुन्हा दाखल झाला आहे.

बेरोजगारांना मिळणार पगाराच्या ५० टक्के भत्ता​

अटकेचा कायदेशीर मार्ग मोकळा :
गुन्हा दाखल झाल्यापासून बऱ्हाटे फरार आहे. पोलिस गेली अनेक दिवस त्याचा शोध घेत आहेत. मात्र, अद्याप तो सापडलेला नाही. त्याला फरार होण्यास मदत केल्याप्रकरणी काही आरोपींना अटक करण्यात आली होती. सर्वोच्च न्यायालयाने देखील जामीन फेटाळल्याने बऱ्हाटेला अटक करण्याचा कायदेशीर मार्ग मोकळा झाला आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Supreme Court rejected pre arrest bail of Ravindra Barhate in Construction Ransom Case