सुप्रियाताई सुळेंनी केली तलवारबाजी

supriya_sule
supriya_sule

हडपसर - ज्या ठिकाणी मुली व महिला सुरक्षित नाहीत तेथील समाज आपली प्रगती करू शकत नाही. महिलांची सुरक्षा ही केवळ तिचा किवा तिच्या कुटूबांचा विषय नसून ती पू्र्ण समाजाची जबाबदारी आहे. आपण सर्वांनी तिला सुरक्षेचे कवच दयायला हवेच पण त्याच बरोबर तिला सबला करण्यासाठी योग्य प्रय्तन केले पाहिजेत, असे मत खासदार सुप्रीयाताई सुऴे यांनी व्यक्त केले. रयत शिक्षण संस्थेचे साधना शैक्षणिक संकुल, पवार पब्लिक ट्रस्ट आणि ऑल महाराष्ट्र थांग-ता असोसिएशन यांच्या संयुक्त विदयमाने महाविदयालयीन विदयार्थीनींना स्व-संरक्षणासाठी 'आता मी सुरक्षित', 'माझे रक्षण मीच करणार' या विषयावर प्रशिक्षण कार्यशाळेचे उदघाटन खासदार सुळे यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी त्या बोलत होत्या. 

याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष चेतन तुपे, प्राचार्य डॅा. अरविंद बुरूंगले, प्राचार्य अजित अभंगकर, सुरेखा ठाकरे, वैशाली नागवडे उपस्थित होते.

खासदार सुळे पुढे म्हणाल्या, महिलांनी आपले संरक्षण स्वत:च करावयास शिकले पाहिजे. त्यासाठीची विविध टेकनिक्स अत्मसात करायला हवी. महिलांच्या मनात आत्मविश्वास व जिद्द असेल आणि प्रतिकार करण्याची शक्ती असले तर महिलांवर होणारे अत्याचाराचे प्रमाण कमी होईल. यासाठी आता मी सुरक्षित... माझे रक्षण मीच करणार या विषयावरील कार्यशाळा उपयोगी ठरेल.

थांग-ता ही आपल्या भारतातील प्राचीन मार्शल आर्ट युध्द कला आहे. महाराष्ट्र थांग-ता ही राष्ट्रीय स्तरावरील थांग- ता संघटनेशी संलग्न आहे. महाराष्ट्रातील विविध भागात या संघटनेच्या माध्यमातून प्रशिक्षण दिले जाते. या संघटनेचे मुख्य प्रशिक्षक व संघटनेचे सचिव महावीर धुळधर यांच्या मार्गदर्शनाखाली व उपाध्यक्ष संतोष महात्मे यांच्या सहयोगाने 27 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर 2018 पर्यंत पुणे शहर व जिल्हयातील विविध अशा निवडक महाविदयालयीन विदयार्थीनींना स्व-संरक्षणाचे दोन दिवसांचे शिवकालीन स्वसंरक्षणाचं प्रशिक्षण दिलं जाणार आहे. या प्रशिक्षणासाठी 35 प्रशिक्षकांची टीम प्रशिक्षण दिले जाणार आहे. 

हडपसर येथील साधना शैक्षणिक संकुलात राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया ताई सुळे यांनी स्वत:च तलावार बाजी केल्याचं पाहायला मिळालं. तलवार बाजीच प्रशिक्षण घेत असताना त्यांच्यात अत्मविश्वास दिसत होता. त्यांची तलवारबाजी पाहून उपस्थितांनी टाळ्या वाजविल्या. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com