esakal | अजितदादा होते आजीचे फेव्हरेट नातू : सुप्रिया सुळे
sakal

बोलून बातमी शोधा

pawar.jpg

 ...आपल्या कुटुंबाने नेहमी आपल्याप्रमाणेच कणखर असायला हवे, असा शारदाबाईंचा कमालीचा आग्रह असे, लहानपणी आमच्या आजीला आम्ही जे पाहिले त्याचे संस्कार आमच्यावरही झाले आहेत. आपल्या मुलांसह संपूर्ण कुटुंबावर त्यांनी कायमच जीव लावला. त्यांचा खंबीरपणा सर्वच पवार कुटुंबियांमध्ये आज दिसतो. अशा शब्दात खासदार सुप्रिया सुळे यांनी शारदाबाई पवार यांच्या आठवणी आज जागविल्या. 

अजितदादा होते आजीचे फेव्हरेट नातू : सुप्रिया सुळे

sakal_logo
By
मिलिंद संगई

बारामती : ...आपल्या कुटुंबाने नेहमी आपल्याप्रमाणेच कणखर असायला हवे, असा शारदाबाईंचा कमालीचा आग्रह असे, लहानपणी आमच्या आजीला आम्ही जे पाहिले त्याचे संस्कार आमच्यावरही झाले आहेत. आपल्या मुलांसह संपूर्ण कुटुंबावर त्यांनी कायमच जीव लावला. त्यांचा खंबीरपणा सर्वच पवार कुटुंबियांमध्ये आज दिसतो. अशा शब्दात खासदार सुप्रिया सुळे यांनी शारदाबाई पवार यांच्या आठवणी आज जागविल्या. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

शारदाबाई पवार यांच्या 45 व्या स्मृतीदिनानिमित्त आज सुप्रिया सुळे यांनी ट्विटरवरुन त्यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. या ट्विटमध्ये त्यांनी नमूद केल आहे की माझी आजी शारदाबाई पवार आम्हा सर्वांना सोडून गेली त्याला आज 45 वर्षे झाली. मला ती आजही आठवते. मी सहा तर अभिजीत चार वर्षांचे असताना विजू अक्का आम्हा दोघांना तिच्या भेटीसाठी घेऊन गेल्या होत्या. आम्हाला पाहून तिच्या चेह-यावर खुललेलं हसू आजही आठवतं. ती आमची शेवटची भेट. 

देशाचा जलखजिना आता एकाच क्लिक वर

या संदर्भात बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, शारदाबाई या अतिशय वेगळ्या होत्या. माझे वडील (शरद पवार) हे राजकीय दौ-यांच्या निमित्ताने बाहेर फिरत असत. मात्र ते रात्री कितीही वाजता घरी आले तरी त्यांना त्या गरमच जेवायला वाढत असत. रात्री दोन वाजताही शारदाबाईंनी पवारसाहेबांना गरम भाकरी करुन दिल्याचे मी स्वत: पाहिले आहे. आम्ही त्या वेळेस बारामतीतील आमराईतील घरात राहायचो. साहेब रात्री येईपर्यंत बाई त्यांची वाट पाहत घराच्या पायरीवर बसून असायच्या. त्या काळात मोबाईल किंवा काहीही संपर्काचे साधन नसायचे, पण साहेबांना कितीही उशीर झाला तरी त्या जागून त्यांची वाट पाहत असत. साहेब जेव्हा घरी यायचे तेव्हा लगेच त्यांना गरमा-गरम जेवण त्या वाढत. 

त्यांच्या आजारपणाच्या काळात त्या मुंबईला होत्या पण त्या काळातही त्या कमालीच्या खंबीर होत्या. अनेकदा त्या लंगडत चालायच्या पण चेह-यावर त्यांचा शारिरीक त्रास कधीच त्यांनी दाखवला नाही. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

अजितदादा फेव्हरेट नातू...
सगळ्या नातवंडांमध्ये अजित पवार हेच त्यांचे सर्वाधिक लाडके नातू होते. बाईंकडून सर्वात जास्त लाड अजितदादांचे व्हायचे. बाईंकडे जे काही शेलकं या प्रकारात मोडणारे खाद्यपदार्थ असायचे ते अजितदादांसाठी त्या राखून ठेवायच्या. बाईंचा दादावर खुपच जीव होता. दादा हा आजीचा सर्वात फेव्हरेट नातू म्हणून कुटुंबिय ओळखायचे.

(Edited by : Sagar Diliprao Shelar)